suvichar

गोड खावंसं वाटतंय, मग घरीच बनवा सफरचंदाची रबडी

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:08 IST)
रबडी ही एक उत्तर भारतीय चविष्ट अशी गोड पाककृती आहे. आपण ही चविष्ट रेसिपी सणासुदीलाच नव्हे तर आठवड्याच्या शेवटी देखील बनवू शकता. चटकन तयार होणारी ही रेसिपी आपल्या घरघुती समारंभात देखील आपण बनवू शकता. सफरचंद, दूध, साखर, वेलचीपूड, काजू आणि बदाम घरात असल्यास आपण हे पदार्थ कधीही बनवू शकता आणि ते देखील फार कमी वेळात. चला तर मग जाणून घेऊ या याची रेसिपी.
 
साहित्य - 
750 मिलीलीटर दूध, 1 सफरचंद किसलेले, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम बारीक कापलेले, साखर आवडीनुसार, वेलचीपूड चवीप्रमाणे.
 
कृती - 
सर्वप्रथम सफरचंद सोलून किसून घ्या. एका कढईत दूध घाला आणि त्याला उकळून घ्या. दूध अर्धा झाले की गॅस मंद करून द्या. आता या मध्ये किसलेले सफरचंद घाला. चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्या. या मध्ये साखर मिसळा आणि शिजवून घ्या. वेलची पूड, काजू, बदामाचे काप घालून ढवळून 1 मिनिटा साठी शिजवून घ्या. सफरचंदाची रबडी खाण्यासाठी तयार. आपली इच्छा असल्यास आपण हे थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

अतिशय शाही आणि चविष्ट पदार्थ मावा साबुदाणा खीर रेसिपी

तुम्ही शौचालय वापरताना या ३ चुका करता का, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे, मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचावासाठी उपाय

Career in Bachelor of Naturopathy and Yogic Science : बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चमकदार त्वचेसाठी ज्येष्ठमध लावण्याचे फायदे आणि पद्धत जाणून घ्या

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments