Daily Horoscope

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

Gulkand Dryfruit Besan Ladoo
पारंपरिक बुंदीच्या लाडूंना उत्तम पर्याय म्हणून बनवता येणारे गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू अतिशय चविष्ट आणि दिसायला देखील सुंदर दिसतात.

गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू
साहित्य-
बेसन (२ वाट्या)
तूप (१ वाटी)
पिठीसाखर (१ वाटी)
वेलची पूड (१/२ चमचा)
सारणासाठी गुलकंद (३-४ चमचे)
बारीक चिरलेले बदाम-काजू.
ALSO READ: गणेशोत्सवात प्रसादासाठी किंवा उपवासासाठी उत्तम पर्याय ''मावा मखाना खीर''
कृती-
सर्वात आधी कढईत तूप गरम करून मंद आचेवर बेसन छान खमंग वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत (सुमारे १५-२० मिनिटे) भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. कोमट मिश्रणात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून व्यवस्थित एकजीव करा. एका वाटीत गुलकंद आणि चिरलेले ड्रायफ्रूट्स एकत्र मिक्स करून ठेवा. बेसनाचा छोटा गोळा हातावर पसरवून त्यात मध्यभागी थोडे गुलकंदाचे सारण भरा आणि गोल लाडू वळून घ्या.
ALSO READ: Modak Variety गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पासाठी खास ट्रेंडिंग मोदकाचे प्रकार
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: गणेशोत्सवात श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी पौष्टिक आणि अत्यंत खुसखुशीत ''मखाना पाग बर्फी''
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam