Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गुळाचा रसगुल्ला रेसिपी

Jaggery Rasgulla
, शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
दूध दीड लिटर 
लिंबाचा रस 2 चमचे
पाणी 5 कप 
गूळ 2 कप
वेलची 
केवडा किंवा गुलाब पाणी 1/2 चमचा 
 
कृती-
गुळाचा रसगुल्ला बनवण्यासाठी सर्वात आधी दूध उकळण्यास ठेवावे. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. दूध फाटल्यानंतर ते कॉटनच्या कपड्यात घालावे. दुधामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून लिंबाचा आंबट पणा दूर करावा. आता या कपड्यावर वजनदार वस्तू ठेवावी. पाणी निघून गेल्यानंतर हे मिश्रण हाताने मळून त्याचे गोळे तयार करून घ्या. आता गुळाचा पाक बनवण्यासाठी पॅनमध्ये पाण्यात गूळ घालून उकळून घ्या. आता पाक उकळल्यानंतर त्यामध्ये हे बॉल्स घालावे व दहा मिनिट शिजू द्यावे. रसगुल्ला तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. आता केवडा वॉटर किंवा गुलाब पाणीमध्ये टाकून थंड करावे.  तर चला तयार आहे आपले गुळाचे रसगुल्ले, जे तुम्ही नैवेद्यात देखील ठेवू शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सॉफ्ट कुकीज बनवण्यासाठी या ट्रिक अवलंबवा