Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बनवा चविष्ट शेवयाची खीर ,जाणून घ्या रेसिपी

बनवा चविष्ट शेवयाची खीर ,जाणून घ्या रेसिपी
, रविवार, 15 मे 2022 (12:00 IST)
खीर ही अशीच एक रेसिपी आहे जी सगळ्यांनाच आवडते. काही लोकांना जेवण खाल्ल्यानंतर काही गोड खायची सवय असते. या साठी खीर हा उत्तम पर्याय आहे. काही लोक रव्याची खीर करतात, काही तांदळाची खीर करतात. आज आम्ही सोपी आणि चविष्ट शेवयाची खीर करण्याची कृती सांगत आहोत. हे करण्यासाठी ही सोपी आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
शेवया, साखर, दूध, हिरवी वेलची, तूप, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता, मनुका, चिरलेले मकाणे , चिरलेली खारीक, चिरलेली बदाम ), केशर (असल्यास)
 
कृती-
सर्व प्रथम कढईत तूप घालून ड्रायफ्रूट्स तळून घ्या. यानंतर शेवया तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. आता पातेल्यात दूध टाकून उकळवून घ्या. हिरवी वेलची बारीक करून त्यात घाला. दूध मंद आचेवर उकळवा. कंडेन्स्ड मिल्क असल्यास ते घालू शकता नाहीतर हे दूध उकळवून घट्ट करा. त्यात केशराचे तुकडे घाला. तसेच शेवया आणि ड्रायफ्रुट्स एकत्र घाला. शेवया वितळायला लागल्यावर पिठीसाखर घाला. आता खीर थोडा वेळ शिजू द्या. शेवया वितळल्यावर गॅस बंद करा,चविष्ट शेवया खीर तयार आहे. वरून ड्राय फ्रुट्स घालून सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

career Tips :एनडीएची तयारी कशी करावी टिप्स जाणून घ्या