Festival Posters

Mango Malpua Recipe मालपुआला द्या आंब्याचा ट्विस्ट; एक अप्रतिम चव

वेबदुनिया फीचर टीम
मंगळवार, 16 जून 2026 (08:00 IST)
आंब्याचा हंगाम असो किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा, मालपुआला आंब्याचा हा ट्विस्ट देऊन तुम्ही नेहमीच्या गोड पदार्थाला एक अप्रतिम चव देऊ शकता. मऊ, रसाळ आणि सुगंधी मँगो मालपुआ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल.
ALSO READ: आंब्याच्या सीझनमध्ये अतिशय चविष्ट Mango Pastry Recipe
साहित्य-
मालपुआच्या मिश्रणासाठी:
आंब्याचा पल्प : १ कप (हापूस किंवा केशर आंबा उत्तम)
मैदा: १ कप
रवा (बारीक): २ ते ३ मोठे चमचे (यामुळे मालपुआ छान कुरकुरीत होतो)
दूध किंवा साय: अर्धा कप (आवश्यकतेनुसार)
बडीशेप पावडर: १ छोटा चमचा (छान स्वादासाठी)
वेलची पावडर: अर्धा छोटा चमचा
तूप किंवा तेल: मालपुआ तळण्यासाठी

साखरेच्या पाकासाठी-
साखर: १ कप
पाणी: १ कप
केशर: ४-५ कड्या (ऐच्छिक)
वेलची पावडर: अर्धा छोटा चमचा

कृती-
१. पाकाची तयारी: एक कढई किंवा पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर त्यात केशर आणि वेलची पावडर टाका. आपल्याला एकतारी पाक करायचा नाहीये, फक्त बोटाला चिकटेल असा गुलाबजामसारखा चिकट पाक हवा आहे. पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा.

२. मालपुआचे मिश्रण बनवणे:एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा, बडीशेप पावडर आणि वेलची पावडर एकत्र करा. आता त्यात आंब्याचा पल्प घालून मिक्स करा. त्यानंतर थोडे थोडे दूध घालत याचे मध्यम स्वरूपाचे मिश्रण तयार करा (मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे, जसे आपण डोश्याचे पीठ करतो तसेच) हे मिश्रण १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा, जेणेकरून रवा छान फुगेल.

३. मालपुआ तळणे: एका सपाट तळ असलेल्या कढईत किंवा पॅनमध्ये तूप/तेल गरम करा. (तुपात तळल्यास मालपुआ जास्त चविष्ट लागतो). तेल मध्यम गरम झाल्यावर, एका मोठ्या चमच्याने (पळीने) मिश्रण कढईच्या मध्यभागी सावकाश सोडा. त्याला पसरवण्याची गरज नाही, ते स्वतःच गोल आकार घेईल. मंद ते मध्यम आचेवर मालपुआ दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कडेने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
ALSO READ: Malpua Recipe मालपुआ
४. पाकात भिजवणे: तळलेला गरम मालपुआ थेट कोमट साखरेच्या पाकात टाका. मालपुआ पाकात २ ते ३ मिनिटे राहू द्या, जेणेकरून तो पाक नीट शोषून घेईल. त्यानंतर मालपुआ पाकातून बाहेर काढा. तुमचा रसाळ मँगो मालपुआ तयार आहे! सर्व्ह करताना वरून पिस्ता आणि बदामाचे काप घालून सजवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दिसायला आकर्षक, चविष्ट आणि बनवायला खूपच सोपे असे मालपुआ रबडी रोल्स
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

NHSRCL Junior Engineer Recruitment 2026: कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

गुळाचा गोडवा आणि मखान्याचे पौष्टिक गुणधर्म यांचा संगम; Jaggery Makhana Lassi Recipe

केवळ डोकेदुखीच नाही, तर ही लक्षणे ब्रेन ट्यूमरचेही लक्षण असू शकतात

12वी नंतर डिप्लोमा इन परफॉर्मिंग आर्ट्स करून करिअर बनवा

टोमॅटो फेशियल करून चेहऱ्यावर पार्लरसारखी चमक मिळवा, अशा प्रकारे टोमॅटोचा वापर करा

पुढील लेख
Show comments