Daily Horoscope
✕

आंब्याच्या सीझनमध्ये अतिशय चविष्ट Mango Pastry Recipe

वेबदुनिया फीचर टीम
शनिवार, 9 मे 2026 (08:00 IST)
मँगो पेस्ट्री घरी बनवण्यासाठी ही एक सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. आंब्याच्या सीझनमध्ये ही पेस्ट्री अतिशय चविष्ट लागते.
साहित्य-
स्पंज केकसाठी:
१.५ कप मैदा
१ कप पिठी साखर
१/२ कप दही (ताजे)
१/२ कप तेल (वासाचे नसलेले)
१ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
१ टीस्पून मँगो इमल्शन किंवा व्हॅनिला एसेन्स
१/४ कप आंब्याचा रस (Mango Pulp)

आयसिंग आणि सजावटीसाठी:
१.५ कप व्हिपिंग क्रीम (थंड)
१/२ कप आंब्याचा रस किंवा प्युरे
बारीक चिरलेले आंब्याचे तुकडे

कृती-
१. केक बेस तयार करणे:
एका बाऊलमध्ये दही आणि साखर एकत्र करून फेटून घ्या. त्यात तेल आणि मँगो एसेन्स घालून नीट मिक्स करा. मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या आणि ओल्या मिश्रणात थोडे थोडे करून मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडे दूध किंवा आंब्याचा रस घाला. केकच्या भांड्याला तेल लावून हे मिश्रण ओता आणि १८०°C वर २५-३० मिनिटे बेक करा (किंवा कुकरमध्ये ३५ मिनिटे शिजवा) केक पूर्णपणे थंड होऊ द्या.

२. क्रीम तयार करणे:
एका भांड्यात व्हिपिंग क्रीम घेऊन ती फ्लफी होईपर्यंत बिटरने फेटून घ्या. या क्रीममध्ये २ चमचे आंब्याचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करा.

३. लेयरिंग आणि फिनिशिंग:
थंड झालेल्या केकचे दोन किंवा तीन आडवे काप (Layers) करा. केकच्या पहिल्या थरावर थोडे साखर-पाणी (Sugar Syrup) शिंपडा जेणेकरून तो मऊ राहील. त्यावर व्हिप्ड क्रीमचा एक थर लावा आणि थोडा आंब्याचा रस (Pulp) पसरावा. अशाच प्रकारे दुसरा आणि तिसरा थर लावून घ्या. वरच्या बाजूने आणि कडेने क्रीम लावून केक नीट कव्हर करा.

४. पेस्ट्री कापणे:
केक सेट होण्यासाठी किमान १ तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर सुरीने त्याचे आयताकृती काप करा. वरच्या बाजूला आंब्याचे बारीक तुकडे किंवा क्रीमचे छोटे डिझाइन काढून सजवा.
ALSO READ: Mango Halwa मँगो हलवा रेसिपी
खास टिप्स-
पेस्ट्रीसाठी हापूस किंवा पायरी आंबा उत्तम असतो, कारण त्यांचा रंग आणि चव गडद असते.
पेस्ट्री कापण्यापूर्वी ती चांगली थंड झालेली असावी, अन्यथा क्रीम विरघळू शकते.
आंब्याचा रस वापरताना तो गाळून घेतल्यास क्रीममध्ये गुठळ्या होणार नाहीत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mango Modak अतिशय रसाळ आणि सुगंधी मँगो मोदक बनवण्याची सोपी पद्धत; लिहून घ्या रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: जेवणाची चव वाढवतो मँगो रायता नक्की ट्राय करा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments