Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Guava Halwa Recipe घरी तयार करा पेरुचा शिरा

Guava Halwa Recipe घरी तयार करा पेरुचा शिरा
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (12:39 IST)
हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरात गरमागरम शिरा खाण्याची पद्धत सुरू होते. गाजर, रवा, मैदा, मूग डाळ किंवा बेसन अशा हलव्याची चव तुम्ही नक्कीच चाखली असेल, पण पेरूचा शिरा कधी खाल्ला आहे का? पेरूचा शिरा वाचल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटत असेल पण एकदा तुम्ही हा हलवा चाखल्यानंतर तुमच्या आवडत्या मिठाईच्या यादीत त्याचा समावेश होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा पेरूचा चविष्ट हलवा.
 
पेरुचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य-
-पेरु- 4
-साखर- 1 कप
-वेलची- एक चतुर्थांश लहान चमचा
-बीटरूट - एक इंच तुकडा
-तुप- एक चतुर्थांश कप
-काजू- 2-3 टेबल स्पून (बारीक चिरलेले)
-बदाम- 2-3 टेबल स्पून (बारीक चिरलेले)
-दूध- अर्धा लीटर
 
कृती- पेरूचा हलवा बनवण्यासाठी आधी मावा घरीच तयार करा. यासाठी कढईत दूध उकळण्यासाठी ठेवा. दूध उकळत असताना, सुमारे 40 मिनिटे ढवळत राहा. दूध घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवा. तुमच्या हलव्याचा मावा तयार आहे. यानंतर, पेरू आणि बीटरूटचे मोठे तुकडे करा आणि अर्धा कप पाण्याने कुकरमध्ये एक शिटी येईपर्यंत थांबा. शिटी येताच गॅस बंद करा. थंड झाल्यावर कुकरमधून पेरू काढून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या, पेरूच्या बिया काढून फेकून द्या.
 
आता गॅसवर एक पॅन ठेवा, त्यात 3 चमचे तूप घाला, चिरलेले ड्रायफ्रुट्स (काजू आणि बदाम) घाला आणि हलके तळून घ्या. ते तळल्यावर त्यात पेरूचा लगदा घाला आणि मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. आता त्यात साखर घालून चांगले शिजवून घ्या. साखर नीट विरघळल्यावर त्यात खवा (मावा) टाका आणि नीट ढवळून पुन्हा शिजवा. 5 मिनिटे शिजवल्यानंतर त्यात वेलची पूड घाला आणि हलवा 2 ते 3 मिनिटे चांगला शिजवा. तुमचा चविष्ट पेरूचा हलवा तयार आहे. या हलव्याची खासियत म्हणजे हा हलवा आठवडाभर साठवता येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘लॉन्ग कोविड’ मुळे स्त्रिया अधिक प्रभावित, तज्ज्ञांचा दावा