Astro Tips for Sindoor हिंदू धर्मात स्त्रिया सिंदूर लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून पाळत आहेत. पण आजच्या काळात सिंदूर लावण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. अनेक स्त्रिया भांगेत बारीक रेषा काढूनच सिंदूर लावतात. तर काही स्त्रिया भांगेत कुंकु भरण्याऐवजी कपाळावर थोडेसे सिंदूर लावून घेतात. असे करणे किती घातक ठरू शकते याची त्यांना कल्पना नसते. महिला ज्या पद्धतीने सिंदूर लावतात त्याचा थेट परिणाम त्यांच्या पतीच्या आयुष्यावर होतो. म्हणूनच सिंदूर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जर तुम्ही तुमच्या भांगेतील कुंकु केसांनी लपवत असाल तर असे करू नका, असे केल्याने तुमच्या पतीवर वाईट परिणाम होतो.
भांगेच्या मध्यभागी सिंदूर लावल्यास पतीचे आयुष्य दीर्घायुषी होते.
जर तुम्ही भांगेच्या मध्यभागी सिंदूर लावलं नाही तर तुमचा नवराही तुमच्यापासून दूर राहील.
ओल्या केसांवर कधीही सिंदूर लावू नका. असे केल्याने घरातील सुख-शांती हिरावून घेतली जाते.
नेहमी केस धुतल्यानंतर आणि आंघोळ झाल्यावर लगेचच सिंदूर लावावं.
कुणाच्या पैशाने विकत घेतलेले सिंदूर कधीही लावू नका, असे केल्यास पतीच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
तुमच्या भांगेत इतर कोणत्याही महिलेचं कुंकु भरु नये. असे केल्याने पतीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
भेट म्हणून दिलेले सिंदूर कधीही वापरू नये. भेटवस्तूमध्ये मिळालेलं सिंदूर वापरल्याने पतीला खूप त्रास सहन करावा लागू शकतो.