Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पक्ष्यांना दाणा टाकण्याचे लाभ

benefits of sowing seeds for birds
, शनिवार, 1 मे 2021 (09:31 IST)
घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी सर्व प्रयत्न करत असतात आणि आपल्याकडून पुण्य घडावं म्हणून चांगले कामंही करतात. शास्त्रानुसार पक्ष्यांना दाणा-पाणी देणे शुभ मानले गेले आहे आणि अनेक लोक असे करतात. अनेक लोक घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये चिमण्यांसाठी दाणे टाकून ठेवतात. जी व्यक्ती पक्ष्यांना दाणे टाकते त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते. दाणे टाकणे शुभ मानले गेले आहे. तर चला मग पक्ष्यांना दाणा टाकण्याचे लाभ काय ते बघू या आणि काय काळजी घ्यावी ते देखील बघू-
 
पक्ष्यांना दाणा टाकण्याचे लाभ
कबूतर दाणे खायला आल्यास शुभ मानलं जातं कारण कबूतर बुध ग्रहाचा मानला गेला आहे कारण कबूतर शांतिचा प्रतीक आहे. तसेच काही लोक पक्ष्यांसाठी गच्चीवर दाणा टाकतात. गच्ची राहूचं प्रतीक आहे. जेव्हा कबूतर गच्चीवर दाणा खाण्यास येतात तेव्हा बुध आणि राहूचं मिलाप होतं.
 
पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याने जीवनातील अनेक समस्या सुटतात. एकीकडे प्रभूची भक्ती प्राप्त होते तर दुसरीकडे आरोग्य चांगलं राहतं आणि पुण्य प्राप्ती होते.
 
जर आपल्या अस्वस्थता जाणवत असेल किंवा आपली कामे वेळवर पूर्ण होत नसतील. कुटुंबात क्लेश असेल, आरोग्याची काळजी वाटत असेल तर निश्चित पक्ष्यांना दाणा खाऊ घातल्याने जीवनातील सर्व कष्ट नाहीसे होतात.
 
जनावरांना आहार देण्याचे फायदे
मुंग्या, चिमण्या, तालुडी, कबूतर, पोपट, कावळा आणि इतर पक्ष्यांसह गाय, कुत्रा यांना नियमाने दाणा-पाणी दिल्याने मानसिक शांती लाभते.
गहू खाऊ दिल्याने सूर्याशी नि‍गडित पीडा दूर होते.
तांदूळ दिल्याने मा‍नसिक त्रास दूर होऊन शांती लाभते.
मूगाची डाळ दिल्याने बुध ग्रहाशी निगडित समस्या सुटतात.
चण्याची डाळ दिल्याने गुरुची कृपा राहते.
जनावरांना ज्वार खाऊ घातल्याने शुक्र ग्रहाची समस्या सुटते.
 
व्यवसाय करणार्‍यांना दररोज पक्ष्यांना दाणा टाकणे फायद्याचं ठरतं. याने आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते.
कुंडलीत राहू-केतूची महादशा असल्यास पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावा.
कावळा आणि कुत्र्यांना ग्रास दिल्याने शनी, राहू आणि केतू प्रसन्न होतात.
कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने शत्रू भय दूर होतं.
खारु ताईला बाजरी, बिस्किट, पोळी खाऊ घातल्याने जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते.
मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या तयार करुन खाऊ घातल्याने जुनी संपत्ती पुन्हा प्राप्त होण्याचे योग बनतात.
मुंग्यांना साखर, पंजिरी किवा बेसानचे लाडू खाऊ घातल्याने आरोग्य लाभ, कर्जापासून मुक्ती मिळते आणि मा‍नसिक शांती प्राप्त होते.
 
परंतू अनेकदा काही पुण्याचे काम करताना देखील आपल्या हातून नकळत चुका घडतात आणि नुकसान झेलावं लागतं. तर दाणा-पाणी किंवा आहार देताना ही काळजी घेतली पाहिजे ज्याने पुण्य प्राप्ती होऊ शकेल. जनावर किंवा पक्षी येत असलेली जागा स्वच्छ ठेवावी. कारण असे केले नाही तर त्या घरात राहणार्‍या लोकांवर राहू भारी पडतो आणि हे अशुभ ठरतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मे’ 2021 महिन्याचे राशीफल