Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vastu Tips घरात कधी ही हे झाडे लावू नये होऊ शकतो तोटा

Plants to be avoided according to Vastu
, गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (10:43 IST)
आपण घरात सजावटीसाठी झाडे लावतो पण आपल्याला माहित आहे का की काही झाडे असे असतात ज्यांना घरात कधीही चुकून देखील लावू नये. वास्तुनुसार काही झाडांमध्ये वास्तुदोष असतो. याना घरात लावून घरात पैसे राहतं नाही. हे झाडे घरातील भरभराटीला सौख्याला घरातून बाहेर नेत. असे सांगितले आहे की या झाडांबद्दल कळतातच आपण यांना घरातून बाहेर काढून टाका.
 
1 खजूराचे झाड - 
वास्तू शास्त्रानुसार घरात कधीही खजुराचं झाड लावू नये. ज्या घरात खजुराचे झाडं लावलेले असतात त्या घरात दारिद्र्य येतं. तिथे आर्थिक त्रास होतात. घरातील मंडळींच्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो.
 
2 निवडुंगाचे झाडं -
निवडुंग घरात लावू नये. निवडुंग लावल्यानं घरातील सर्व पैसे वायफळ खर्च होतात. ज्यांचा घरात निवडुंग लावतात त्यांचा घरात पैश्यांचा योग्य वापर होत नाही.
 
3 बांबूचं झाडं -
बांबूचं झाडं उपयोगी असतं. परंतु वास्तु विज्ञानानुसार बांबूचं झाडं कधीही घरात लावू नये. हे लावल्यानं घरात समस्या आणि त्रास उद्भवतात. हिंदू धर्मात बांबू हे मृत्यूच्या वेळी अंत्य क्रियेसाठी वापरतात. म्हणून बांबूला घरात लावणं अशुभ मानतात.
 
4 बोराचं झाडं - 
वास्तु शास्त्राज्ञाच्या मते बोराचं झाडं घरात लावू नये. घरात लावल्यानं धनहानी होते. असे मानले जातात की बोराचे झाडं लावल्यानं सर्व धन नष्ट होत.
 
5 चिंचाच झाडं - 
ज्या प्रकारे चिंचेची चव आंबट असते. त्याप्रमाणे ज्या घरात चिंचेचे झाडं असतं त्या घरातील आनंदात आंबटपणा येतो. वास्तू विज्ञानांनुसार घरात लावलेलं चिंचाच झाडं घराच्या प्रगतीला रोखत. तसेच घरातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो.
 
6 पिंपळाचं झाडं - 
वास्तू शास्त्रानुसार घरात कधीही पिंपळाचं झाडं लावू नये. जर आपल्या घरात पिंपळाचं झाडं असल्यास त्याला एखाद्या पावित्र्य नदीत किंवा पावित्र्य जागी वाहून द्या. किंवा एखाद्या देऊळात लावून द्या. असे म्हणतात की यामुळे आपल्या पैश्याचा नाश होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, स्नानघर आणि स्वछतागृह एकत्र नसावं, चंद्रदोष लागतो