Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राधा-कृष्णाचं आपल्या जीवनात हे महत्व असेल तर आजच लावा फोटो

radha krishna photo in bedroom
पती-पत्नीचे संबंध मधुर असले तर पूर्ण कुटुंब आनंदी राहतं. पती व पत्नी यांच्यात समन्वय नसल्यास वैवाहिक जीवनात अडचणी वाढत जातात. या समस्यांवर मात करण्यासाठी बेडरूममध्ये राधा-कृष्णचे फोटो लावण्याचा सल्ला दिला जातो. काय महत्व आहे राधा-कृष्णाचा फोटो लावण्यामागे जाणून घ्या:
 
या गोष्टी लक्षात ठेवा
 
* राधा-कृष्ण प्रेम
राधा-कृष्ण यांच्यातील प्रेम सर्वांसाठी आदर्श आहे. म्हणूनच मंदिरात त्यांच्या मूर्तींची पूजा केली जाते. जेव्हा यांची मूर्ती किंवा फोटो दररोज डोळ्यासमोर येतो तेव्हा मनात जीवन साथीदारासाठी प्रेम वाढतं. राधा-कृष्ण यांच्यातील प्रेम निःस्वार्थ प्रेम असल्याचे प्रतीक आहे म्हणून पती-पत्नीने आपसात असे प्रेम निर्माण केले तर वैवाहिक जीवनातील अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
 
* फोटो कुठे लावायला हवा?
प्रेमाचे प्रतीक राधा-कृष्णाची मूर्ती किंवा सुंदर चित्र बेडरूममध्ये असावे. चित्राला लाल रंगाची फ्रेम असल्यास उत्तम. लाल रंग देखील प्रेमाचे प्रतीक आहे. अशाने पती- पत्नी यांच्यातील समस्या दूर होतील. बेडरूममध्ये फोटोची जागा अशी असावी की येता-जाता त्यावर आपोआप लक्ष जाईल.
 
* या गोष्टींकडे देखील लक्ष द्या
आनंदी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकमेकांच्या विश्वासाचा भंग कधीच करु नये. जुन्या चुका पुन्हा वारंवार केल्या जाऊ नयेत, त्याबद्दल वारंवार चर्चा करु वाद घालू नये. बेडरूममध्ये कोणत्याही तिसर्‍या व्यक्तीबद्दल बोलू नये. एकमेकांचा सन्मान द्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय!