Marathi Biodata Maker

Silver Elephant चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने ऐश्वर्य आणि सुख- शांती लाभेल

Webdunia
चांदी हा शुभ धातू मानला जातो. शुभ प्राण्यांमध्ये हत्तीचा समावेश होतो. जेव्हा दोन शुभ गोष्टी जुळतात तेव्हा घरात आनंदाचा वर्षाव होतो हे नक्की. चांदीचा हत्ती घरात चांगली बातमी आणतो, पैशाची समस्या दूर करतो, यशाची दारे उघडतो. संपत्ती वाढते. परस्पर संबंधात गोडवा आणतो. घराला अनैतिकतेपासून दूर ठेवते. घरात धार्मिकता आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण होते.
 
वास्तु शास्त्रात हत्ती घरासाठी भाग्यवान मानला जातो. घराच्या उत्तर दिशेत लहानशी ठोस चांदीची हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर्य यात वृद्धी होते. याने गणपती आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

1 घरामध्ये हत्ती ठेवणाऱ्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ होते. संतान प्राप्ती होते. बौद्धिक विकास होतो. सामाजिक आणि राजकीय पातळीवरही आदर वाढतो.
2 घराच्या उत्तर दिशेला हत्तीची जोडी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि धनलाभ होतो.
3 जर राहू कुंडलीत पाचव्या किंवा बाराव्या स्थानात बसला असेल तर घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने राहूला शांती मिळते.
4 चांदीच्या हत्तीची जोडी घरात ठेवल्याने पैशाचे नवीन स्त्रोत उघडतात आणि करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता असते.
5 हत्तीची मूर्ती अभ्यासाच्या खोलीत ठेवल्यास मुलांना अभ्यासात रस निर्माण होऊन मेंदूला एकाग्रता मिळते.
6 वास्तू म्हणते की हत्तीच्या जोडीची मूर्ती मुख्य दरवाजासमोर ठेवल्यास घरामध्ये धनाचा मार्ग उघडतो.
7 बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती जोडीने ठेवल्यास पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.
8 जर तुम्ही घरात किंवा दुकानात धनप्राप्तीसाठी हत्तीची मूर्ती ठेवत असाल तर हत्तीची सोंड वरच्या बाजूला ठेवावी.
9 कुटुंबात सुख-शांती राहण्यासाठी हत्तीची मूर्ती ठेवत असाल तर हत्तीची सोंड खाली झुकलेली असावी.
10 चांदीच्या हत्तींची जोडी ठेवताना त्यांचे चेहरे विरुद्ध दिशेला नसून एकमेकांसमोर असले पाहिजेत.
11 लाल किताबानुसार, चांदीचा हत्ती घरात किंवा खिशात ठेवावा. पाचव्या आणि बाराव्या भावात बसलेल्या राहूसाठी हा उपाय आहे. त्यामुळे मुलांना त्रास होत नाही आणि व्यवसायातही नफा मिळतो.
12. दिवाणखान्यात पितळेचा हत्ती ठेवल्यास शांती आणि समृद्धी प्रदान करणारा ठरतो. जीवनात प्रत्येक कामात यश मिळवून देतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shri Gangadhar Suprabhatam श्री गङ्गाधर सुप्रभातम्

सोमवती अमावस्याला हे उपाय करा, दारिद्रय दूर होईल

अंबरनाथ शिवमंदिर

आरती सोमवारची

Maha Shivaratri 2026: महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments