चांदी अत्यंत शुभ धातू आहे. या धातूने तयार वस्तूंमुळे शुभ फल मिळतात. चांदीचे दागिने, देवाच्या चांदीच्या मुरत्या, चांदीची भांडी या प्रकारे चांदी अनेक वस्तू तयार करण्यात वापरली जाते. त्याचप्रकारे चांदीचा मोर देवतांना अती प्रिय असल्याचे मानले जाते. देवी सरस्वती, प्रभू श्रीकृष्ण, कार्तिकेय व गणपतीच्या फोटोत आपल्याला मयूर बघायला मिळतात. आज जाणून घ्या घरात चांदीचा मोर ठेवल्याचे काय फायदे आहेत ते-
1. नाचत असलेला चांदीचा मोर घरात असल्याने धनासंबंधी अडचणी दूर होतात.
2. चांदीचा मोर दांपत्य जीवनात प्रेम व शांती ठेवण्यास मदत करतं.
3. चांदीच्या करंड्यावर चांदीचा मोर असल्यास अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे.
4. घराच्या बैठकीत चांदीचा मोर यशाचे संकेत देतं.
5. देवघरात स्थिर चांदीचा मोर ठेवल्याने पुण्य प्राप्ती होते. जीवनात यश प्राप्ती होते.
6. अविवाहित किंवा विवाहास इच्छुक नसलेल्या लोकांच्या खोलीत चांदीचा मोर ठेवल्याने त्यांच्या मनात प्रेम व विवाह याप्रती कल वाढतो.
7. भाग्य उजळावा यासाठी एखाद्या पौर्णिमेला चांदीचा मोर घरी आणून त्याची पूजा करुन तिजोरीत ठेवावा.