नाईट जेस्मिन किंवा पारिजात याला हरसिंगार देखील म्हणतात. जाणून घ्या घरात पारिजात लावण्याचे फायदे-
1. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण वास्तूदोषाने मुक्त असतं.
2. पारिजात झाड जेथे असतं तेथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो.
3. पारिजातक फुलांचा सुंगध जीवनातील ताण दूर करुन आनंदी वातावरण निर्मित करतं.
4. याच्या सुंगधाने मन आणि मस्तिष्क शांत होण्यास मदत होते.
5. या झाडाची लागवण केल्याने कुटुंबात कलह होत नाही.
6. असे म्हणतात की जिथे पारिजातकाचे झाड असतं, तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात.
7. अंगणात पारिजातकाच्या झाडाची फुले जिथे उमलतात तिथे सदैव शांती आणि समृद्धी वास करते.
8. डॉक्टरांच्या सल्ल्याने 15-20 फुलांचे सेवन केल्यास हृदयविकाराची समस्या असल्यास फायदा होतो. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
9. या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनादरम्यान झाली. हरिवंश पुराणात त्याचे तपशीलवार वर्णन आहे.
10. सत्यभामा यांच्या आग्रहामुळे श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजात वृक्ष आणून पृथ्वीवर लावले.