वास्तू शास्त्राप्रमाणे आपले बेडरूम वास्तुदोष मुक्त असले पाहिजे. याने पती-पत्नीमधील होणार्या वादाला टाळता येतं आणि आपसात प्रेम वाढतं ज्याने संसार सुखाचा होतो. म्हणूनच आपली लाईफ अजून रोमांटिक आणि खुशाल बनविण्यासाठी बेडरूम वास्तू टिप्स अमलात आणा आणि सुखी राहा.
* मँडेरिन बदकाची जोडी प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून बेडरूममध्ये या बदकाच्या जोडप्याचे फोटो किंवा मूर्ती ठेवली पाहिजे. याने पती-पत्नीचे आपसातील संबंध मधुर होतात.
* बेडरूममध्ये लागलेल्या नाइट लॅम्पचा प्रकाश सरळ बेडवर नको पडायला.
* शक्तयोत्तर बेडरूममध्ये आरसा नको. आणि असला तरी बेडच्या अगदी समोर नको. आरशात बेडचे प्रतिबिंब दिसता कामा नये. याने पती किंवा पत्नीमधून एकाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याने संबंधात अंतर वाढतं आणि प्रेम कमी होतं जातं.
* बेडरूममध्ये एकाच बेडवर एकच गादी असली पाहिजे. बेड, चादर आणि गादी वेगळी-वेगळी असल्यास संबंधात ताण येण्याची शक्यता असते.
* बेडच्या खाली अळगळ सामान किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. याने नवरा-बायकोमध्ये पेश्यामुळे वाद निर्माण होतात.
* बेडरूममध्ये सजावटीसाठी झाड लावणे योग्य नव्हे. याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आपसात संबंध बिगडतात.
* बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र किंवा मूर्ती ठेवली पाहिजे.
* बेडरूममध्ये फाउंटेन किंवा पाणी प्रदर्शित होत असलेली पेंटिंग लावणे टाळा. याने संबंधात कडूपणा येतो.