Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पश्‍चिमेला चुकीच्या पदात दरवाजा असेल तर त्याचे मिळणारे फळं जाणून घ्या

पश्‍चिमेला चुकीच्या पदात दरवाजा असेल तर त्याचे मिळणारे फळं जाणून घ्या
, शनिवार, 20 जुलै 2019 (13:03 IST)
- पश्‍चिमेला चुकीच्या पदात दरवाजा असेल तर धनहानी, पुत्रहानी, शासनभय, दुर्भाग्य, शोक, शोषण, डाव्या पायाचं दुखणं किंवा इजा अशी फळं मिळतात. ब्लाडर-गाल ब्लाडर-स्टमक, लीव्हर यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
उपाय :
- उंबरठय़ाखाली सात लीडची व सात स्पायरॅलिग स्वस्तिक टाकून दिग्बंधन करावं.
- दरवाजासमोर पाचू रत्न निक्षेप करावं. त्याला आसन म्हणून लीडचं स्वस्तिक वापरावं.
- दरवाजासमोर कोणत्याही बुधवारी ७५0 ग्रॅम ब्राँझ पुरावं.
- चांदीच्या पत्र्यावर मगर कोरून ती दरवाजाकडे पाठ येईल अशाप्रकारे निक्षेप करावी.
- दाराच्या भिंतीवर घरात शनितारका यंत्र लावावं.
- दरवाजाच्या आसपास गडद हिरव्या व पोपटी रंगाची योजना कोणत्याही माध्यमातून करावी.
- धातूचे दोन हत्ती दरवाजाच्या मागे ठेवावेत.
- दाराच्या डोक्यावर सीलिंगला १६ चौकोनी पिरॅमिडची रचना करावी.
- उंबरठय़ासमोर येलो जैसलमेरची लादी घालावी. लादीखाली वर सांगितल्याप्रमाणं पाचू रत्न असेल. छताला जे पिरॅमिडचं डिझाईन आपण लावणार आहोत, त्यातील मधल्या पिरॅमिडच्या खाली हा पाचू येईल, असं पाहावं.
- दार डिझाईनचं करणार असाल तर चौकोनी आकारांचा वापर करावा.
- चौकटीवर वरच्या बाजूला वास्तुसंजय यंत्र लावावं. चौकटीवर खोबण करून मंगलकलश ठेवावं. (पानं अशोकाची वापरावीत)
- विधिवत रत्नाध्याय करून घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमच्यासोबत असं घडतं असेल तर समजा पालटणार नशीब