कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात वास्तू शास्त्राला खूप महत्त्व असते. वास्तुशास्त्राद्वारे घराला दोषमुक्त केले जाऊ शकते. यामुळे घरात ऊर्जा प्रवाह, आनंद आणि समृद्धी प्रबल होते. आम्ही तुम्हाला घरात पायदान किंवा डोरमॅट ठेवण्याच्या योग्य दिशेबद्दल सांगणार आहोत.
- वास्तूनुसार, तुटलेल्या उंबरठ्यामुळे घरात वाद वाढतात. अशा परिस्थितीत पायदान यावर ठेवल्याने लहान सहन वादापासून मुक्ती मिळू शकते.
- वास्तूमते घराच्या डोअरमॅटचा आकार आयताकृती असावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नाते अधिक मजबूत होतात.
– जर तुमच्या घरात अशांतीचे वातावरण निर्मित होत असेल तर पायदानाखाली काळ्या कपड्यात थोडासा कापूर बांधून ठेवा. याने नकारात्मकता दूर होते आणि संबंध मजबूत होतात.
- हे लक्षात ठेवा की जर घराचा मुख्य दरवाजा पूर्वेकडील दिशेने असेल तर पायदानाचा रंग हलका असावा.
- जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे असेल तर डोरमॅटचा हलका रंग घ्या.
- वास्तूप्रमाणे, जर तुम्ही डोरमॅटखाली फिटकरी ठेवली तर त्याने नकारात्मकता दूर होते.