प्लॉट खरेदी करताना तो वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही याची खात्री करून घ्या. वास्तुशास्त्राची सुरवात प्लॉटच्या खरेदीपासूनच होते, असे म्हटले तर वावगे ठऱणार नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपण प्लॉटची जागा कशी आहे ते पाहिले पाहिजे. तेथे आपले घऱ उभे रहाणार आहे, त्यामुळे सर्व दृष्टीने ती जागा आपल्याला फायदेशीर ठरली पाहिजे. जागेच्या भोवताली असलेली माती आणि परिसरावर आपल्या घरातील सुख-दुःख अवलंबून असतात. त्यामुळे कोणताही प्लॉट खऱेदी करताना वास्तुशास्त्रातील जाणकाराला घेऊन आधी तो प्लॉट त्याला दाखविला पाहिजे. त्यानुसार प्लॉट अनुकूल आहे की नाही हे तो सांगेल. पण तत्पूर्वी काही बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे.
हा प्लॉट खरेदी करू नक ा
1. दिवाळखोरी जाहीर केलेल्या व्यक्तीचा प्लॉट खरेदी करू नका. कारण त्याच्या इतिहासाचा संबंध आपल्या भविष्याशी जोडला जाण्याची शक्यता असते. थोडक्यात हा प्लॉट खरेदी केल्यानंतर दिवाळखोरीची परंपरा पुढे चालू राहू शकते.
2. कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीचा प्लॉट खरेदी करू नये.
3. वेडसर व्यक्तीकडून किंवा तशी परंपरा असलेल्या घराण्याचा प्लॉट खरेदी करणे टाळावे.
4. देश सोडून गेलेल्या व्यक्तीकडून प्लॉट खरेदी करू नये.
ND
ND
त्याचप्रमाणे देवळाला दान दिलेली, गावाच्या रखवालदाराला दिलेली, विश्वस्त संस्थेला दिलेली, कुणाच्याही नावे नसलेली जागा खरेदी करणे टाळावे. वारूळे, हाडे, सापळे अशा भीतीदायक बाबी असणारी जागाही खरेदी करू नये.
पूर्वेच्या दिशेने असलेली जागा विद्वान, तत्वज्ञ, धर्मज्ञ, प्राध्यापक, शिक्षक यांच्यासाठी चांगली असते. उत्तरेच्या दिशेने असलेली जागा सत्तेत, प्रशासनात असलेल्यांसाठी आणि सरकारसाठी काम करणाऱ्यांसाठी चांगली असते. दक्षिणेकडे तोंड करून असलेली जागा व्यावसायिकांसाठी फायदेशीर असते. व्यावसायिक आस्थापनात काम करणाऱ्यांनाही शुभदायी असते. पश्चिमेला असलेला प्लॉट समाजाला सेवा पुरविणाऱ्या वर्गासाठी चांगला असतो.