Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जमिनीचा चढ व उतार

- डॉ. सुधीर पिंपळे

जमिनीचा चढ व उतार
चुंबकीय क्षेत्रानंतर जमिनीच्या चढउताराबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे कारण चुकीच्या जागेचा चढ किंवा उतार अपायकारक ठरतो. त्याचप्रमाणे जर पूर्वेला भर असेल तर धनप्राप्ती, आग्नेयेला दाह, ‍दक्षिणेला मृत्यू, नैरृत्येला धननाश, पश्चिमेला पुत्रनाश, वायव्येला परदेशात वास्तव्य, उत्तरेला धनागम, ईशान्येला विद्या लाभ होतो. जमिनीच्या मध्ये खड्डा असल्यास कष्टदायक असते.

ईशान्येला खड्डा असल्यास घरमालकाला धन-सुख, पूर्वेला वृद्धी, उत्तरेला धनलाभ, आग्नेयेला मृत्यूशोक, दक्षिणेला गृहनाश, नैरृत्येला धनहानी, पश्चिमेला अपयश तर वायव्येला मानसिक उद्वेग होतो.

या प्रकारे जमिनीच्या उतारचढावाला आपण खालील क्रमाने ठेवू शकतो.

* पूर्व व आग्नेय दिशेला उंच, पश्चिम व वायव्येला उतार असलेली जमीन शुभ असते.
* जमिनीचा चढ दक्षिण व आग्येन दिशेला असेल तर आणि पश्चिम व उत्तरेला उतार असेल तर सर्व कार्यांचे फळ शुभ मिळतात.
* नैरृत्य आणि दक्षिणेला चढ व उत्तर व ईशान्येला उतार घराला स्थिरता देतो.
* पश्चिमेला चढ व ईशान्य तसेच पूर्वेला उतार पुत्र कारक असतो.
* वायव्य व पश्चिम दिशेला उंच व पूर्व आणि आग्नेयेला उतरण भांडणांना जन्म देते व तेथे राहण्याची इच्छा होत नाही.
* वायव्य व उत्तरेला चढ आणि दक्षिण व आग्नेयेला उतार असणार्‍या घरात रहाणार्‍या व्यक्ती रोगाने पछाडलेला असतो.
* दक्षिणेत भर व नैरृत्येला उतार असणार्‍या जमिनीवर हत्या होते.
* दक्षिणेला चढ आणि पश्चिमेला उतार असल्याने भूत बाधा, धन, पुत्र आणि पशुहानी संभवते.
* नैरृत्य, ईशान्य व वायव्येला वर आणि आग्नेयेला उतार असणार्‍या जमिनीत पूर्णपणे नाश होतो.
* ज्या जमिनीचा उभार उत्तर आग्नेय आणि पश्चिमेला असून खोलवा फक्त नैरृत्येला असेल तर अशा घरात राहणारे लोक कायम दरिद्रिता असतात.
* नैरृत्य, आग्नेय व उत्तरेला चढ, वायव्य तसेच पूर्वेला उतार असेल तर त्या घरात राहणारे अल्पायुषी होतात.
* आग्नेयेला उभार आणि नैरृत्य व उत्तरेला उतार असणार्‍या जमिनीवर स्थैर्य मिळते.
* नैरृत्येला चढ व आग्नेय तसेच वायव्येला उतार अशा ठिकाणी राहणारे लोक धार्मिक व वैरागी असतात.
* उत्तरेचा उभार अन् आग्नेय, नैरृत्य व वायव्येचा उतार कल्याणकारी असतो.
* ज्या जमिनीचा चढ नैरृत्य व आग्नेयेला आणि उतार उत्तरेला असतो त्या जमिनीवर राहणार्‍याची उत्तरोत्तर प्रगती होते.
* पूर्वेला उतार आणि नैरृत्य व पश्चिम दिशेला चढ असणार्‍या जमिनीवर राहणार्‍याला उच्चपद मिळते.
* उत्तर व वायव्येला उठाव आणि ‍दक्षिण खाली अशी जागा व्यापारासाठी उपयुक्त.
* मध्ये उतार आणि बाजूने चढ कोणत्याही दृष्टीने चांगला नाही.
* गजपृष्ठ म्हणजे नैरृत्य व वायव्येला उंच असणारी जमीन आयुष्य व संपत्तीत वाढता वसा देते.
* कर्मपृष्ठा म्हणजे ईशान्येला चढ असणार्‍या जमिनीत लक्ष्मीचा निवास नसतो.
* नागपृष्ठा म्हणजे पूर्व-पश्चिम लांब उत्तर, दक्षिणेला भर असणारी जमीन हानिकारक आहे.
* पूर्व, उत्तर व ईशान्येला उतार असणारी जमीन शुभ फळ देते. शेवटी दिशेच्या उतारानुसार मिळणारे परिणाम पुढील प्रमाणे.

पूर्वेला उतार - उत्तम वंशवृद्धी, ज्ञानवृद्धी, बल व धन प्राप्ती
आग्नेयेला उतार - खर्चात वाढ, दु:ख
दक्षिणेला उतार - धन-नाश, वंश-नाश, मृत्यू संभव
नैरृत्येला उतार - रोग, त्रास, चोर भय, धन-नाश
पश्चिमेला उतार - धन नाश, आर्थिक संकट 
वायव्येला उतार - कुलनाश, शत्रुवृद्धी
उत्तरेला उतार - उत्तम धन प्राप्ती, वंशवृद्धी
ईशान्येला उतार - उत्तम ज्ञानप्राप्ती, धनप्राप्ती 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वप्नांवरुन जाणा तुमचे भविष्य..