Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झटपट आणि चविष्ट रवा सॅन्डविच

breakfast recipe
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:59 IST)
साहित्य :
2 वाटी रवा, 1 शिमला मिर्च, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपूर्ती मीठ, 1 वाटी दही, तेल, आणि ब्रेड.
 
 
कृती : 
एका भांड्यात रवा घ्या, त्यात दही मिसळा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च, टोमॅटो घाला, हिरव्या मिरच्या आणि मीठ चवीपुरती घालून त्यामध्ये कोथिंबीर घाला. आता या घोळामध्ये उकळलेलं पाणी घाला आणि चांगले ढवळून घ्या. घोळ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावं. आता या घोळाला 10 ते 15 मिनटे असेच पडू द्या. पॅनला गॅस वर गरम करण्यासाठी ठेवा, आणि त्यावर तेल घाला. आता ब्रेडच्या स्लाइसला या घोळात बुडवून पॅन वर शेकण्यासाठी ठेवा. मंद आंचे वर ब्रेड दोन्ही बाजूने शेकून घ्या. ब्रेड तपकिरी रंगाची झाल्यावर गॅस वरून काढून घ्या. 
 
आता झटपट आणि चविष्ट रवा सॅन्डविच तयार. हे सँडविच सॉस बरोबर सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Covid-19 : मनाच्या सामर्थ्याने कोरोनाला जिंकू शकता, या गोष्टी अमलात आणा