2 कांदे (उभे चिरून)
2 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून
1 कप बेसन पीठ
1/2 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून ओवा
1/2 टी स्पून लाल तिखट
2 टी स्पून गरम तेल
मूठभर कोथिंबीर
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ
कांदा भजी बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व साहित्य मिसळून घ्या. त्यात 2 मोठे चमचे पाणी घालून घोळ तयार करा. एका नॉन स्टिक कढईत तेल गरम करा. गरम तेलाचं मोहन मिश्रणात टाकून चांगले मिक्स करुन घ्या. आता कांद्यासकट मिश्रण उचलून तेलात सोडा. सोनेरी होयपर्यंत तळून घ्या. नंतर टिशू पेपरवर काढा. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.