suvichar

दही कबाब रेसिपी

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (14:03 IST)
संध्याकाळी चहा सोबत किंवा स्नॅक्स म्हणून दही कबाब खूपच शानदार रेसिपी ठरते. स्वादिष्ट दही कबाब तयार करणे सोपे आहे. जाणून घ्या कृती- 
 
सामुग्री- 
दही- 1 कप 
बेसन- 5 मोठे चमचे 
कोथिंबीर- 1 मोठा चमचा बारीक चिरलेली
आलं- 1/2 लहान चमचा कापलेलं
कांदा- 2 मोठे चमचे बारीक कापलेले
हिरवी मिरची- 1/2 लहान चमचा बारीक कापलेली
जिरपूड- 1/2 लहान चमचा
गरम मसाला पावडर- 1/2 लहान चमचा 
मिरपूड-1/4 लहान चमचा
तेल- गरजेप्रमाणे
मीठ- चवीनुसार
 
कृती
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या.
नंतर दही 8 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. 
एका पॅनमध्ये हलकं बेसन भाजून, रंग बदलू नये याची काळजी घ्या.
आता एका बाउलमध्ये बेसन, मिरच्या, कांदे, मीठ, आलं व इतर मसाले टाकून मिसळा.
नंतर यात दह्याचं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करुन घ्या.
हे मिश्रण हातावर पसरवून त्यात दही ठेवून कबाबचा आकार द्या.
हे कबाब तयार करुन जरावेळ फ्रिज मध्ये ठेवून द्या.
नंतर तेल गरम करुन सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.
आपले दही कबाब चटणीसोबत सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

ऑफिसच्या थकव्यानंतरही कसे फ्रेश दिसायचे? जाणून घ्या या टिप्स

तुम्ही या ६ लसी घेतल्या आहेत का? त्या प्रौढांसाठी सर्वात महत्वाच्या आहेत

अल्झायमरसह या ६ आजारांसाठी ध्यान सर्वात प्रभावी आहे

पंचतंत्र : बेडूक आणि साप

तुमचा पार्टनर लैंगिक स्वच्छतेची काळजी घेत नाही का? या समस्या उद्भवू शकतात, तज्ञ काय म्हणतात

पुढील लेख
Show comments