Daily Horoscope
✕

मुलांसाठी रोज टिफिन करिता फक्त १० ते १५ मिनिटांत बनवा हे ५ स्वादिष्ट चिल्ले

Webdunia
गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 (13:23 IST)
मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी (टिफिन) झटपट, पौष्टिक आणि चविष्ट ५ प्रकारच्या चिल्ल्यांची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 
 
बेसन-व्हेजी चीला (Besan Veggie Chilla)
साहित्य: १ कप बेसन, २ चमचे रवा, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, पाव चमचा ओवा, हळद, मीठ आणि पाणी.
 
कृती: 
सर्व साहित्य एकत्र करून मध्यम सरबरीत पीठ भिजवून घ्या. तव्यावर थोडे तूप किंवा तेल लावून छोटे छोटे चिल्ले दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर शेकून घ्या.
 
रवा-दही चीला  (Rava Dahi Chilla)
साहित्य: १ कप बारीक रवा, १/२ कप दही, बारीक चिरलेली सिमला मिरची, मक्याचे दाणे, कोथिंबीर, मीठ आणि पाणी.
 
कृती: रवा, दही आणि थोडे पाणी एकत्र करून ५ मिनिटे बाजूला ठेवा. त्यानंतर भाज्या व मीठ मिसळा. तव्यावर तूप लावून मंद आचेवर खरपूस शेकून घ्या.
 
ओट्स आणि चीज चीला (Oats Cheese Chilla)
साहित्य: १ कप ओट्स पावडर (ओट्स मिक्सरला बारीक करून), २ चमचे बेसन, १/४ कप दूध किंवा पाणी, मीठ, काळी मिरी पूड आणि किसलेले चीज.
 
कृती: ओट्स पावडर, बेसन, मीठ, काळी मिरी आणि पाणी/दूध मिसळून पीठ तयार करा. चिल्ला तव्यावर पसरवल्यानंतर वरून थोडे चीज भुरभुरा. चीज वितळल्यावर आणि चिल्ला शेकल्यावर घडी घालून टिफिनमध्ये द्या.
 
मुग डाळ चीला  (Moong Dal Chilla)
साहित्य: रात्रभर किंवा २ तास भिजवलेली पिवळी मुग डाळ, १ हिरवी मिरची, थोडे आले, जीरे, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.
 
कृती: भिजवलेली डाळ, आले आणि जीरे मिक्सरला थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यात मीठ आणि कोथिंबीर मिसळा. तव्यावर तूप लावून पातळ चिल्ले तयार करा. हा प्रोटीनयुक्त चिल्ला मुलांसाठी खूप आरोग्यदायी आहे.
 
पालकाचा हिरवा चीला (Palak Chilla)
साहित्य: १ कप बेसन, १/२ कप पालकाची प्युरी (पालक उकडवून बारीक केलेला), पाव चमचा हिंग, ओवा, चाट मसाला आणि मीठ.
 
कृती: बेसनामध्ये पालकाची प्युरी, हिंग, ओवा, चाट मसाला आणि मीठ घालून पीठ मळा. तव्यावर छोटे चिल्ले शेकून घ्या. यात भाज्या लपवून मुलांना खाऊ घालता येतात.
 
टिफिनसाठी महत्त्वाच्या टिप्स:
हे चिल्ले टोमॅटो केचप किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत टिफिनमध्ये द्यायला उत्तम ठरतात.मुलांसाठी बनवताना तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर केल्यास चिल्ले मऊ राहतात आणि चवही छान येते.
ALSO READ: घरी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल 'तवा बटर पराठा' मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक आणि रंगीत नाश्ता बीटरूट पराठा एक उत्तम पर्याय
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुलांच्या टिफिनमध्ये रोज पोळी-भाजी नको! हे १५ भन्नाट पर्याय एकदा करून पाहा

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Winter Recipe हिवाळ्यात बाजरीच्या पिठाचा पौष्टिक आणि चविष्ट शिरा कसा बनवावा?

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments