Publish Date: Wed, 18 Jun 2025 (08:00 IST)
Updated Date: Tue, 17 Jun 2025 (19:39 IST)
साहित्य
तुरीची डाळ - अर्धा कप
हिरवी मूग डाळ - अर्धा कप
चिंचेचा कोळ - दोन टेबलस्पून
साखर किंवा गूळ - एक टीस्पून
तिखट - अर्धा टीस्पून
हळद -अर्धा टीस्पून
मोहरी - एक टीस्पून
जिरे - अर्धा टीस्पून
हिंग - चिमूटभर
हिरव्या मिरच्या - दोन
कढीपत्ता
कोथिंबीर
गरम मसाला - अर्धा टीस्पून
तेल - दोन टेबलस्पून
मीठ चवीनुसार
सुक्या खोबऱ्याचा किस
कृती-
सर्वात आधी तूर डाळ आणि मूग डाळ घ्या आणि ती स्वच्छ करा आणि दोन ते तीन वेळा धुवा. यानंतर, कुकरमध्ये तूर आणि मूग डाळ, पाणी, हळद, चवीनुसार मीठ, साखर घाला आणि नंतर कुकरचे झाकण लावा आणि मोठ्या आचेवर ठेवा. कुकरमधील सर्व साहित्य ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. यानंतर, गॅस बंद करा आणि कुकर थंड होऊ द्या आणि प्रेशर आपोआप सोडा. आता एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला आणि मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे तडतडू द्या.आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हिंग घाला तसेच कढीपत्ता घाला आणि चिंचेचा कोळ घाला. आता यानंतर त्यामध्ये तिखट घाला. आता उकडलेले डाळ, गरम मसाला आणि पाणी घाला आणि शिजवा. यानंतर, डाळ झाकून ठेवा आणि १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. यानंतर, गॅस बंद करा. आता तयार आंबट गोड वरण मध्ये तुम्ही गूळ देखील घालू शकतात. तसेच आवडीप्रमाणे सुक्या खोब्ऱ्यचा किस देखील घालू शकतात. आता तयार आंबट गोड वरणात कोथिंबीर गार्निश करा. तर चला तयार आहे आपले चविष्ट आंबट गोड वरण रेसिपी, भात आणि पोळीसोबात नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik