Festival Posters

चविष्ट काश्मिरी दम आलू

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2024 (07:43 IST)
बऱ्याच घरात कांदा लसूण खात नाही .आपण कांदा लसूण चा वापर न करता देखील चविष्ट दम आलू बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
1/2 किलो लहान बटाटे, 1 कप दही,3 चमचे काश्मिरी लाल तिखट,3 /4 कप मोहरीचे तेल, चिमूटभर हिंग,1 दालचिनी,1 तमालपत्र , 2 लवंगा, 1 मोठी वेलची, काळेमिरे, 1 चमचा जिरे,1 चमचा सुंठपूड , शोप,मीठ चवीप्रमाणे .
कृती -
सर्वप्रथम लहान बटाटे स्वच्छ करून धुवून,अर्धा चमचा मीठ पाण्यात घालून उकळवून घ्या. कुकर मध्ये उकळवत असाल तर 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करा. बटाटे थंड झाल्यावर सोलून घ्या आणि टूथपिक ने छिद्र करा. आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि त्या तेलात बटाटे तळून घ्या.   
आता एका भांड्यात दही फेणून घ्या आणि एका वाटीत लाल तिखट घ्या त्याच्यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. कढईत दोन चमचे तेल घालून हिंग, तिखटाची  पेस्ट आणि पाणी घाला.उकळी येऊ द्या. या मध्ये फेणलेले दही घाला आणि सतत ढवळत राहा हळू हळू पाणी घाला. या मध्ये 1 चमचा शोप घाला .या मध्ये लवंग,काळी मिरी ,मोठी वेलची,तमालपत्र,दालचिनी,जिरे,सुंठपूड,घाला. आता  तळलेले बटाटे घालून हळुवार ढवळा. मीठ घालून उकळी येऊ द्या. काश्मिरी दम आलू खाण्यासाठी तयार. आपण गरम गरम दम आलू  हे पोळी सह सर्व्ह करा.    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

नेहमीची कचोरी खाण्याऐवजी कचोरीचे हे ५ भन्नाट प्रकार नक्की ट्राय करा

करवंद खा आणि राहा निरोगी! जाणून घ्या करवंदाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

BARC Paramedical Recruitment 2026: भाभा अणुसंशोधन केंद्राने पॅरामेडिकल प्रवर्गातील गट 'ब' मधील सहा पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली

Makeup Tips: वयापेक्षा १० वर्षांनी तरुण दिसायचे असेल, तर मेकअप करताना या सोप्या टिप्स अवलंबवा

Health Tips: राजमा खाणे कोणासाठी धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

पुढील लेख
Show comments