Dharma Sangrah

उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस

Webdunia
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (11:24 IST)
साहित्य - 
5 चमचे किसलेलं नारळ, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, बेदाणे, काजू, 3 -4 उकडलेले बटाटे, 3 चमचे एरोरूटच पीठ, तेल किंवा तूप तळण्यासाठी.
 
सारणाची कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात किसलेलं नारळ घाला त्यामध्ये शेंगदाण्याच कूट घाला. या मध्ये आलं-मिरची पेस्ट, काजू बेदाणे (किशमिश), कोथिंबीर, आणि लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घालून मिसळून घ्या.
 
पॅटीस बनविण्याची कृती - 
सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगल्या प्रकारे कुस्करून घ्या. या मध्ये एरोरूटच पीठ घाला. सैंधव मीठ घाला. चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि घट्ट गोळा मळून घ्या. आता आपल्या हातावर बटाट्याचे मिश्रण घ्या आणि त्याला हातानेच पुरीचा आकार द्या. त्यामध्ये नारळाचे सारण भरा आणि सर्व बाजूने त्याला एकत्र करून गोलाकार द्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तयार करून त्या बॉलच्या आकाराचे गोळे एरोरूटच्या पिठामध्ये रोळून घ्या.
 
आता कढईत शेंगदाण्याचं तेल किंवा तूप तापवायला ठेवा. तेल गरम झाल्यावर हे बटाट्याचे गोळे त्यात हळुवार सोडा. तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. आता या तळलेल्या पॅटिसांना टिशू पेपर वर काढून ठेवा. जेणे करून ते जास्तीचे तेल शोषून घेईल. 
 
चविष्ट गरम उपवासाचे बटाटा पॅटीस खाण्यासाठी तयार. हे पॅटीस हिरव्या चटणी आणि दह्यासह सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

सौभाग्य आणि आस्वाद: वटपौर्णिमेच्या उपवासासाठी शरीराला ऊर्जा देणारा पारंपारिक पदार्थ

डॉक्टरांनी सांगितलेल्या या ५ सवयी दीर्घायुष्यासाठी उपयुक्त ठरू शकतात

शिवराज्याभिषेकोत्सव दिन २०२६: ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीलाच का झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक?

रेल्वेमध्ये ११९ पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांना संधी मिळेल

निर्जीव आणि कोरड्या केसांना नवसंजीवनी देतील हे टिप्स

पुढील लेख
Show comments