Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चविष्ट फणसाची भाजी जाणून घ्या रेसिपी

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2024 (15:05 IST)
फणसाची भाजी चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. ही भाजी ड्राय आणि ग्रेव्ही यापद्धतीत देखील बनवली जाते. दोन्ही प्रकाराने बनवलेली ही भाजी चवीला खूप चविष्ट लागते.  
 
साहित्य- 
250 ग्रॅम फणस, 
अर्धा चमचा जिरे 
अर्धा चमचा मेथी दाणे 
अर्धा चमचा हळद 
गरम मसाला 
हींग 
एक चमचा हिरवी मिरची 
कांदा 
एक चमचा तिखट 
धणे पूड 
चवीनुसार मीठ 
अर्धा कप मोहरीचे तेल 
बारीक चिरलेली कोथिंबीर 
 
कृती-
फणस धुवून बारीक तुकडे करून घ्यावे. मग कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे, कांदा, आले लसूण पेस्ट घालावी. आता या मध्ये मिरची, हळद, तिखट, गरम मसाला, धणे पूड, कोथिंबीर घालावी. तसेच टोमॅटो देखील घालावा. मसाला चांगला परतवला गेल्या नंतर त्यामध्ये फणसाचे तुकडे घालावे. यानंतर चवीनुसार मीठ घालावे. मग तीन ते चार मिनिट झाकून ठेवावे. फणसाचे तुकडे नरम झाले की समजावे भाजी शिजली, भाजी शिजल्यानंतर यावर चिरलेली कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली फणसाची भाजी जी तुम्ही पोळी, पराठा सोबत खाऊ शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Diwali Saree Look : फेस्टिव्ह दिवाळी साडी लुक: या दिवाळीत एथनिक आणि शोभिवंत लुक कसा मिळवायचा

Health Tips :बनावट हिरव्या भाज्या कशा ओळखायच्या,या व्हिडीओने ओळखा

Diwali Colorful Lights : हे दिवे दिवाळीत तुमच्या घराचे सौंदर्य वाढवू शकतात

दिवाळी फराळ रेसिपी : खमंग शेव

3000 वर्ष जुना हा मसाला आहे आरोग्यासाठी वरदान, शरीराला होतील हे 6 फायदे

पुढील लेख
Show comments