मसाला रोस्टेड काजू रेसिपी
साहित्य-
काजू - दोन कप
तूप - दोन चमचे
काळे मीठ - अर्धा चमचे
लाल तिखट -अर्धा चमचे
मिरे पूड- एक चमचा
चाट मसाला - अर्धा चमचा
हळद - एक चिमूटभर
कृती-
सर्वात आधी एक पॅन गरम करा आणि तूप घाला. आता काजू घाला आणि मंद आचेवर भाजा. नंतर काळे मीठ, लाल तिखट, हळद, मिरे पूड आणि चाट मसाला घाला आणि मंद आचेवर भाजा. आता तयार मसाला रोस्टेड काजू एका वाटीत घ्या व नक्कीच सर्वांना खायला द्या.
हनी-गार्लिक काजू रेसिपी
साहित्य-
काजू - दोन कप
मध - दोन टेबलस्पून
बारीक चिरलेला लसूण - एक चमचा
सोया सॉस - दोन चमचे
बटर किंवा तूप - दोन चमचे
मिरे पूड - चिमूटभर
कृती-
सर्वात आधी गॅस वर एक पॅन ठेवा, त्यात बटर घाला किंवा तूप घालून गरम करा. आता चिरलेला लसूण घाला आणि हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर काजू घाला आणि हलके भाजून घ्या. आता मध आणि सोया सॉस घाला. आता मिरे पूड घाला आणि गॅस बंद करा. तयार हनी-गार्लिक काजू सर्वांना खायला द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik