Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल 'तवा बटर पराठा' मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय

'Tawa Butter Paratha'
मऊ, लुसलुशीत आणि हॉटेलसारखा पदर सुटलेला 'तवा बटर पराठा' हा पनीरची भाजी, छोले किंवा अगदी चहा आणि लोणच्यासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. घरी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल तवा बटर पराठा कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी जाणून घ्या.... 
साहित्य-
गव्हाचे पीठ: २ कप (तुम्ही हवे असल्यास १ कप गव्हाचे पीठ आणि १ कप मैदा वापरू शकता)
दूध किंवा पाणी: पीठ मळण्यासाठी (कोमट दूध वापरल्यास पराठे जास्त मऊ होतात)
बटर (लोणी): ४ ते ५ मोठे चमचे (पराठ्याला लावण्यासाठी आणि भाजण्यासाठी)
तेल: १ मोठा चमचा (पीठ मळताना घालण्यासाठी)
मीठ: चवीनुसार
ओवा किंवा कसुरी मेथी: १ छोटा चमचा (ऐच्छिक - चवीसाठी)
 
कृती-
१. पीठ मळणे: एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ, १ चमचा तेल आणि ओवा/कसुरी मेथी टाकून मिक्स करा. आता थोडे थोडे कोमट दूध किंवा पाणी घालत पराठ्याचे पीठ मळून घ्या. हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा थोडे मऊ असावे. पिठाला वरून थोडे बटर किंवा तेल लावून १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा, जेणेकरून पीठ छान मुरेल.
 
२. पराठा लाटणे आणि लेअर्स (घड्या) पाडणे: मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे (पेढे) तयार करा. एक गोळा घेऊन चपातीसारखा पातळ लाटून घ्या. लाटलेल्या चपातीवर चमचाभर बटर चांगले पसरवून लावा आणि वरून थोडे सुके पीठ भुरभुरा. आता लेअर्स पडण्यासाठी एक घडी पुढे, एक मागे तशी चपातीची घडी घालत जा.  आता ही लांब पट्टी गोल गुंडाळून त्याचा पुन्हा एक गोळा तयार करा आणि शेवटचे टोक खाली दाबून बंद करा.
हा गोळा सुक्या पिठात घोळवून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. 
 
३. तव्यावर भाजणे:
तवा चांगला गरम करून घ्या. त्यावर लाटलेला पराठा टाका. एका बाजूने थोडे फुगे आले की पराठा पलटा. दुसऱ्या बाजूनेही शेकल्यावर दोन्ही बाजूंनी भरपूर बटर लावा आणि उलथण्याने  हलके दाबून पराठा छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.  
हा गरमागरम तवा बटर पराठा तुमच्या आवडत्या भाजीसोबत सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मधमाशी चावल्यास घाबरू नका; सर्वप्रथम या ५ गोष्टी करा