Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरीच बनवा हैदराबादी तडका डाळ

Webdunia
शनिवार, 19 डिसेंबर 2020 (12:02 IST)
डाळ किंवा वरण आपण बऱ्याचवेळा आपण खाल्ले असणार पण आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हैदराबादी तडका डाळ.
साहित्य- 
1 कप मसूर डाळ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 मधून चिरलेल्या मिरच्या, 1/2 चमचा आलं-लसूण पेस्ट,1/4 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, गरजेप्रमाणे तेल, कोथिंबीर बारीक चिरलेली.   
 
कृती - 
एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये कांदा घालून परतून घ्या. या मध्ये टोमॅटो आणि मिरच्या घाला आणि शिजवून घ्या. टोमॅटो शिजल्यावर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून 1 मिनिटे शिजवून घ्या. नंतर या मध्ये मसूर डाळ, तिखट, हळद, घालून 2 मिनिटे शिजवून घ्या. यामध्ये अडीच कप पाणी घाला आणि डाळ शिजे पर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. वरून मीठ घाला. 15 मिनिटे शिजवून घ्या. उकळी आल्यावर गॅस बंद करा कोथिंबीर वरून भुरभुरून द्या आणि नान किंवा पोळी किंवा राईस सह सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

पुढील लेख
Show comments