ganesh chaturthi

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2026 (13:19 IST)
झटपट आणि कुरकुरीत व १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची चकली बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य-
गव्हाचे पीठ: २ वाट्या
बेसन: २ चमचे
तिळ: १ ते २ चमचे
ओवा: १ चमचा (हतावर चोळून घातलेला)
लाल तिखट: १ ते २ चमचे (स्वादानुसार)
हळद: ½ चमचा
हिंग: ¼ चमचा
गरम तेलाचे मोहन: २ ते ३ मोठे चमचे
मीठ: स्वादानुसार
पाणी: पीठ मळण्यासाठी
तेल: चकल्या तळण्यासाठी
ALSO READ: 5 Types Of Chakli: या 5 प्रकारच्या चकलींसह पावसाचा आनंद घ्या
कृती-
पीठ वाफवणे (महत्त्वाची पायरी): गव्हाचे पीठ एका सुती कपड्यात (रुमालात) बांधून त्याची पुरचुंडी बनवा. ही पुरचुंडी कुकरमध्ये पाणी घालून (शिट्टी न लावता) किंवा स्टीमरमध्ये १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
पीठ चाळणे: पीठ वाफवून थंड झाल्यावर ते घट्ट होते. ते हाताने किंवा उखळीत फोडून चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. वाफवल्यामुळे चकली अतिशय हलकी आणि कुरकुरीत होते.
मसाले घालणे: चाळलेल्या पिठात बेसन, तिळ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि २-३ चमचे गरम तेलाचे मोहन घाला.
पीठ मळणे: सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट (पण मऊ) पीठ मळून घ्या. पीठ जास्त सैल किंवा जास्त घट्ट असू नये.
चकल्या पाडणे: चकलीच्या सोऱ्याला (साच्याला) आतील बाजूने थोडे तेल लावा. चकलीची ताटी घालून त्यात पिठाचा गोळा भरा. बटर पेपरवर किंवा ताटावर गोलाकार चकल्या पाडून घ्या.
तळणे: कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेलात चकली सोडून मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. चकल्या पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा, म्हणजे त्या महिनाभर छान कुरकुरीत राहतात.
ALSO READ: सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Chakli Bhajani Recipe चकलीची भाजणी कशी करायची? योग्य प्रमाण जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रात्रभरात तुमच्या आतड्यांमधील सर्व घाण काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर सक्रिय राहायचे असेल, तर सकाळी सूर्यनमस्कार करा, त्याचे फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : दयाळूपणाचे फळ; गोष्ट शेतकरी आणि कबुतराची

पावसाळ्यात या घरगुती वस्तू लवकर खराब होतात! बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

पुढील लेख
Show comments