Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ओल्या काजूची उसळ

ओल्या काजूची उसळ
साहित्य : १ १/२ कप ओले काजू (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.), 2 मध्यम कांदे, ४ लसणीच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं, १/४ कप ओलं खोबरं, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ, आवडत असल्यास गूळ किंवा साखर, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग, २ चमचे मोहरी. 

कृती: १. ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. 
२. सालं काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत. 
३. कांदा बारीक चिरावा. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मिरच्या चिरून घ्याव्यात. 
४. कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. मग हळ्द व हिंग घालावे. 
५. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देउ नये. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा. 
६. मग काजू घालून जेवढी पातळ हवी तेवढे पाणी घालावे. काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे. 
७. आता त्यात गरम मसाला, चिंच/कोकमं, मीठ, गूळ घालावा. 
८. खोबरं घालून ढवळावे. 
९. वर कोथिंबीर पेरून पोळी/भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी. 

उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मटण कोफ्ते