Dharma Sangrah

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

Webdunia
सोमवार, 2 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
एक कप काळी मसूर  
चार टोमॅटो 
एक हिरवी मिरची 
आले 
अर्धा चमचा जिरे  
चिमूटभर हिंग 
दोन चमचे तूप 
एक चमचा हिरवी कोथिंबीर  
अर्धा चमचा हळद 
अर्धा चमचा गरम मसाला 
एक चमचा धणे पूड 
चवीनुसार मीठ 
 
कृती-
सर्वात आधी मसूर डाळ धुवून घेऊन कुकरमध्ये टाकावी. मग त्यामध्ये पाणी घालावे. आता हळद आणि मीठ घालून डाळ शिजवून घ्यावी. आता एका कढईमध्ये तूप घालावे. त्यामध्ये हिंग आणि जिरे घालावे.  तसेच त्यामध्ये हळद आणि धणे पूड घालावी. मग टोमॅटो, आले, हिरवी मिरची आणि तिखट घालावे. आता हे परतवून घ्यावे. तसेच कुकर उघडून डाळ या तयार मसाल्यामध्ये घालावी.व चवीनुसार मीठ घालावे.तुम्हाला जशी डाळ हवी असेल म्हणजे घट्ट किंवा रसदार त्यानुसार पाणी घालावे. आता गरम मसाला घालून झाकण ठेऊन दोन मिनिट शिजवून घ्यावे. तयार डाळीवर कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली मसूर फ्राइड डाळ रेसिपी गरम गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments