Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट एग समोसे

Make delicious egg samosas for breakfast Delicious And Tasty Egg Samose for breakfast Make delicious  egg smose recipe for breakfast in marathi नाश्त्यासाठी बनवा चविष्ट एग समोसे  रेसिपी in marathi एग समोसे रेसिपी नाष्ट्या साठी इन मराठी Webdunia Marathi
, शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (22:25 IST)
आपण वेगवेगळ्या प्रकारचे समोसे खाल्ले असतील पण अंड्याचे समोसे ट्राय केले आहेत का? नसेल तर हिवाळ्यात एकदा प्रोटीनयुक्त अंड्याचे समोसे नक्की बनवा. या सामोस्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात प्रोटीन भरपूर असतात आणि तुम्ही नाश्त्यातही ते खाऊ शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य -
6 अंडी, 1 किसलेला बटाटा, 4 बारीक चिरलेले कांदे , चिरलेली हिरवी मिरची, 1 किसलेला गाजर , कोथिंबीर, 300 ग्राम मैदा, 1 टीस्पून  बेकिंग पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि  तेल. 
 कृती- 
एका वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ मिसळा. नंतर तेल घालून पीठ मळून घ्या आणि पीठ सेट होण्यासाठी दोन तास ठेवा.
आता कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले चार कांदे, हिरवी मिरची सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात एक किसलेला बटाटा आणि गाजर घालून ढवळून घ्या.
नंतर मीठ आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवून बटाटे आणि गाजर मऊ होईपर्यंत शिजवा. 
साधारणपणे  5-7 मिनिटांत भाजी शिजेल, नंतर त्यात 6अंडी फोडून ती वितळेपर्यंत शिजवा. त्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
तोपर्यंत पिठाचे छोटे-छोटे रोल करून लहान व पातळ चपात्यासारखे लाटून घ्या. 
अंड्याचे मिश्रण चपातीवर ठेवा आणि समोस्यां प्रमाणे त्रिकोणी आकार द्या. 
चपातीच्या काठावर थोडेसे पाणी लावून समोसे बंद करा. नंतर कढईत तेल गरम करून तयार समोसे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.हिरव्या चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship Tips:रागावलेल्या जोडीदाराला मनवण्यासाठी या युक्त्या अवलंबवा , प्रेम अधिक वाढेल