Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात झटपट तयार करा तवा पिझ्झा

instant tawa pizza
, गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (17:31 IST)
पिझ्झा जे लहान मुलांना काय मोठ्यांना देखील आवडतो. पण प्रत्येक वेळी बाहेरून पिझ्झा मागविणे परवडत नाही. तर या साठी आपण घरीच मुलांना आवडणारी ही डिश तयार करू शकता. या साठी ओव्हन देखील आवश्यक नाही आपण तव्यावर देखील हे करू शकता. चला तर मग जाणून घ्या साहित्य आणि कृती.
 
साहित्य -
पिझ्झा चे पीठ बनविण्यासाठी -
2 कप मैदा, 2 चमचे ऑलिव्ह तेल, मीठ चवी पुरते, 1 लहान चमचा साखर, 1 लहान चमचा इन्स्टंट ड्राय ऍक्टिव्ह यीस्ट.
 
पिझ्झा टॉपिंग साठी - 
1 ढोबळी मिरची, 3 बेबी कॉर्न, 1 /2 कप पिझ्झा सॉस,1/2 कप मॉझरेला चीझ, 1/2 छोटा चमचा इटालियन मिक्स हर्ब्स.
 
कृती -
मैदा चाळून त्यामध्ये ड्राय इन्स्टंट यीस्ट, ऑलिव्ह तेल, मीठ आणि साखर मिसळा. कोमट पाण्याच्या साहाय्याने कणके प्रमाणे 5 ते 7 मिनिटं मळून घ्या. भांड्याला तेल लावून कणीक झाकून 2 तास उष्ण ठिकाणी ठेवा. हे पीठ फुगून दुप्पट होईल. हे पीठ पिझ्झा बनविण्यासाठी तयार आहे.
 
टॉपिंग साठी बिया काढून ढोबळी मिरची बारीक पातळ लांब कापा. बेबीकॉर्न गोलाकार अर्धा सेमीचे तुकडे कापा आणि भाज्यांना तव्यावर टाकून 2 मिनिटे थोडे मऊ करा.पिझ्झा साठी अर्धा पीठ गोल कणीक मळून गोळे बनवा. गोळ्याला कोरडे मैद्याचे पीठ लावून 10 -12 इंच व्यासाचे 1/2 से.मी. जाडसर पिझ्झा लाटून तयार करा.
 पॅन मध्ये थोडंस तेल लावून पिझ्झा झाकून 2 मिनिटे मंद आचेवर तपकिरी रंग येई पर्यंत ठेवा. पिझ्झा पालटून द्या आणि पिझ्झावर टॉपिंग करा.

सर्वप्रथम पिझ्झावर सॉसचा पातळ थर लावा. नंतर ढोबळी मिरची आणि बेबी कॉर्न थोड्या-थोड्या अंतराने लावा. भाज्यांवर मॉझरेला चीझ घाला. या नंतर पिझ्झा झाकून 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. चीझ वितळणे आणि खालील पिझ्झा बेस तपकिरी होई पर्यंत शेकावे. दर 2 मिनिटाने पिझ्झा तपासात राहा. पिझ्झा तयार झाल्यावर वरून हर्ब्स घालून कापा आणि गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यातील आजार आणि त्यावर उपचार