Festival Posters
✕

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

Webdunia
शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (13:17 IST)
साहित्य-
1 कप पोहे 
1 चमचा तेल
1/2 चमचा जिरे 
1 चमचा मोहरी 
1/2 कप मटर
चवीनुसार मीठ 
1/2 चमचा हळद 
1 चमचा शेंगदाणे 
2 हिरवी मिरची तुकडे केलेले 
1 कांदा बारीक चिरलेला 
1 चमचा लिंबाचा रस 
1 चमचा हिरवी कोथिंबीर 
 
कृती- 
सर्वात आधी पोहे चाळणीमध्ये घालावे व चाळून घ्यावे.आता हे पोहे पाण्याने ओले करावे म्हणजे ते नरम होतील. तसेच 10-15 मिनट असेच भिजत राहू द्यावे. आता एक कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. आता यामध्ये मोहरी घालावी नंतर जिरे घालावे. आता यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालावे. तसेच आता यामध्ये शेंगदाणे घालावे. मग नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्यावा. तसेच मटर आणि मसाले देखील घालून घ्यावे. आता हे दोन मिनिट शिजू द्यावे.यानंतर यामध्ये हळद आणि मीठ घालावे. व आता भिजवलेले पोहे घालावे. तसेच 2-3 मिनट तक वाफ येऊ द्यावे. आता यामध्ये लिंबाचा रस देखील घालावा. व कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपले ब्रेकफास्ट करिता पौष्टिक पोहे, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सुके खोबऱ्याचा किस गार्निश करू शकतात. आवडीप्रमाणे डाळींबाचे दाणे, शेव, तिखट बुंदी देखील प्लेट मध्ये पोहे काढल्यावर गार्निश करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments