Panchamrut Recipe पंचामृत साहित्य - 4 चमचे दही, 2 चमचे तूप, 1 वाटी दूध, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मध
पंचामृत कृती - पंचामृत वापरण्यात येणारे साहित्य ताजे असावे. नेहमी चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यात पंचामृत बनवावे. पंचामृत तयार करण्यासाठी एका भांड्यात फेटलेलं दही घ्यावं. त्यात दूध, मध, साखर, तूप घालून चांगले एकत्र करुन घ्यावं. मग त्यात 10 तुळशीची पाने घालावी. पंचामृत तयार आहे.
पंचामृताचे फायदे
पंचामृत सेवन केल्याने शरीर मजबूत आणि रोगमुक्त राहते.
ज्याप्रमाणे आपण देवाला पंचामृताने स्नान घालतो, त्याचप्रमाणे स्नान केल्याने शरीराचे तेज वाढते.
याचे नियमित सेवन केल्याने केस काळे आणि दाट होतात.
ते मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे.
हे पित्त दोष संतुलित करते.