Marathi Biodata Maker
✕

चटपटीत मटार लोणचे रेसिपी

Webdunia
शुक्रवार, 31 जानेवारी 2025 (08:00 IST)
हिरवे मटार  - दोन कप
साखर - एक कप
धणे - एक टेबलस्पून
बडीशेप - एक टेबलस्पून
जिरे - एक टेबलस्पून
मेथीचे दाणे - अर्धा टेबलस्पून
ओवा - अर्धा टेबलस्पून  
काळी मिरी
मोहरीचे तेल - अर्धा कप
हिंग - अर्धा टीस्पून
कलौंजी - आर्धा टीस्पून
हळद - एक टीस्पून
तिखट - दोन चमचे
मीठ - दोन चमचे
काळे मीठ - एक टीस्पून
व्हिनेगर - दोन टेबलस्पून
ALSO READ: लिंबू-आल्याचे लोणचे रेसिपी
कृती- 
चटपटीत मटारचे लोणचे करण्यासाठी सर्वात आधी तीन कप पाणी उकळवावे. यानंतर साखर घाला आणि नंतर मटार घाला व उकळवा. आता गॅस बंद करा आणि मटार थंड पाण्यात टाकून थंड करा.आता मटार चाळणीत काढून टाका आणि पाणी पूर्णपणे काढून टाका. नंतर ते कापडावर पसरवा किंवा पंख्याखाली ठेवा. आता एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, जिरे, मेथीचे दाणे घालावे. नंतर ओवा, काळी मिरी आणि पिवळी मोहरी घालून परतवून घ्या.  आता भाजलेले मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग आणि काजू घाला. तसेच त्यात वाटलेले मसाले, हळद, लाल तिखट, मीठ, काळे मीठ आणि व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा. नंतर मसाल्यांमध्ये मटार घाला आणि चांगले मिसळा.आता लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरा. तर चला तयार आहे आपले चटपटीत मटार लोणचे रेसिपी.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

बाहेरून लाल आणि गोड व रसरशीत सफरचंदं खरेदी करण्याच्या ५ टिप्स वाचा

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हा' खास काढा; सर्दी-खोकला राहील दूर

तुमच्या 'स्मार्ट' मुलांसाठी 'स्मार्ट' रेसिपीस! बालदिनानिमित्त ५ झटपट आणि पौष्टिक नाश्ता प्रकार

World Diabetes Day 2026 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध Jawaharlal Nehru Essay 2026

पुढील लेख
Show comments