Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मटारचे चविष्ट पराठे

peas paratha recipe
, गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (16:56 IST)
साहित्य - 
1 कप उकडलेले ताजे वाटाणे किंवा मटार, 1 कप गव्हाचं पीठ, 1 उकडलेला बटाटा, 1/2 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, शोप, तिखट, चिमूटभर हिंग, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली, चवी प्रमाणे मीठ, तेल.
 
कृती -
सर्वप्रथम उकडलेले वाटाणे मिक्सर मध्ये वाटून घ्या. बटाटे मॅश करा. या वाटलेल्या वाटणं मध्ये बटाटे, मीठ, कोथिंबीर, शोप, हिंग, हिरव्या मिरचीची पेस्ट, तिखट मिसळून गव्हाच्या पिठात घालून मळून घ्या. आता मळलेल्या कणकेचे पराठे लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूने तेल लावून सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम गरम चविष्ट मटार पराठे कढी, दही किंवा लोणच्यांसह सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसांची निगा : केसांना तेल कधी आणि कसे लावावे