साहित्य
2 कप बीट
7-8 लसूण पाकळ्या
2 कढीपत्ताच्या दांडी
1 इंच आले
6 बारीक कापलेली हिरवी मिरची
1 चमचा हळद
2 चमचे कश्मीरी लाल मिरची
2 चमचे मेथी दाने
अर्धा चमचा हिंग
3 चमचे आम्सूल पावडर
2 आचारी मसाला
2 चमचे मोहरी
2 सिरका
स्वादनुसार मीठ
2 कप सरसोच तेल
कृती
बीटचे लोणचे बनवण्या आधी बीटला धुवून सोलून घेणे. मग बीटला चाकूने छोट्या छोट्या तुकड्यात कापून घेणे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्लाइस किंवा फिंगर मध्ये पण कापू शकतात. आता सर्व बीटला मलमलच्या कपडयावर ठेवून 2 ते 3 दिवस उन्हात ठेवा. यानंतर आले किसुन घ्यावे. आता कढई गरम करून त्यात 2 चमचे सरसोचे तेल टाका सरसोचे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आले टाकून परतवून घेणे. आता त्यात कश्मीरी मिर्ची पावडर आणि हळद टाकून मिक्स करा. 15 मिनिट नंतर उन्हात वाळवलेले बीट त्यात घालणे आता याला झाकून 20-25 मिनिट शिजवा. आता दूसरी एक कढई गरम करा. त्यात शोप, मेथीदाने, ओवा, कोथिंबीर टाकून परतवा. यानंतर या मसाल्याला ठंड होण्यासाठी ठेवून देणे. नंतर मिक्सर मधून काढून घेणे आता बीटमध्ये मीठ, अचारी मसाला आणि आम्सूल पावडर टाकून मिक्स करा. नंतर यात मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला टाकणे. आता गॅस बंद करून देणे दुसऱ्या कढइमध्ये 1 कप सरसोचे तेल गरम करणे तयार केलेल्या लोणच्याला ठंड करून जार मध्ये टाकून दया. आता या गरम केलेले तेल लोणच्यात टाकणे. मग लोणचे 4-5 दिवस उन्हात ठेवणे तयार आहे आपले बीटचे लोणचे. तुम्ही याला पराठा, पूरी, भातासोबत सर्व्ह करू शकतात.