suvichar
✕

श्राद्ध महाप्रसादासाठी कांदा-लसूण विरहित सात्विक ''कटाची आमटी'' बनवण्याची सोपी पद्धत

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 (16:08 IST)
पितृपक्षात श्राद्ध महाप्रसादासाठी कांदा-लसूण विरहित सात्विक कटाची आमटी देखील बनवली जाते. ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवावी? जाणून घ्या...
 
साहित्य-
चणा डाळीचा कट (पाणी): ३ कप (पुरणाची डाळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी)
शिजवलेली चणा डाळ: २ चमचे (मॅश केलेली)
भाजलेले सुके खोबरे: ३ ते ४ चमचे
तिळ आणि खसखस: १-१ लहान चमचा (भाजलेले)
आले: १ लहान तुकडा
गोडा मसाला: १ ते २ लहान चमचे
लाल तिखट (काश्मिरी/बेडगी): १ ते २ चमचे
हळद, हिंग, मीठ: चवीनुसार
गूळ व चिंच: आवडीनुसार थोडेसे
फोडणीसाठी: २ चमचे साजूक तूप किंवा तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि ताजी कोथिंबीर
 
कृती-
वाटण तयार करणे: भाजलेले सुके खोबरे, तिळ, खसखस आणि आले थोडे पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्या.
फोडणी देणे: एका कढईत/भांड्यात तूप किंवा तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता तडतडू द्या.
मसाला परतणे: तयार केलेले वाटण फोडणीत घाला आणि मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला घालून हलवून घ्या.
कट मिसळणे: आता यात चणा डाळीचा कट (पाणी) आणि शिजवलेली थोडी डाळ मॅश करून टाका. चवीनुसार मीठ, थोडा गूळ आणि चिंचेचा रस घाला.
उकळी आणणे: आमटीला मंद आचेवर छान उकळी येऊ द्या, जेणेकरून मसाल्यांची चव कटात उतरेल. 
शेवटी ताजी कोथिंबीर भुरभुरा.विशेष टीप:पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी ही अळूची भाजी आणि कटाची आमटी वाढताना वरून साजूक तुपाची धार सोडून सर्व्ह करा.
ALSO READ: पितृपक्षात खिरीला अत्यंत महत्त्वाचे स्थान! पूर्वजांच्या नैवेद्यासाठी खिरीचे हे प्रकार नक्कीच बनवू शकतात
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पितृपक्ष विशेष कांदा-लसूण विरहित ''अळूची पातळभाजी'' रेसिपी बनवण्याची सोपी पद्धत

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments