साहित्य-
दोन- मध्यम आकाराच्या काकडी
एक कप- दही
एक- हिरवी मिरची
एक चमचा कोथिंबीर
अर्धा चमचा- साखर
मीठ
अर्धा चमचा- तेल
१/४ चमचा- मोहरी
अर्धा चमचा- जीरे
चिमुटभर हिंग
कढीपत्त्याची पाने
कृती-
सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्याला मीठ लावून काही मिनिटे ठेवा. नंतर पाणी काढून घ्या. एका बाउलमध्ये फेटलेले दही घ्या, त्यात काकडी, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर आणि मीठ मिक्स करा. आता एका छोट्या तव्यावर तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जीरे टाका, ते तडतडू लागल्यानंतर हिंग आणि कढीपत्ता घाला. हे दही आणि काकडीच्या मिश्रणावर घाला. आणि चांगले मिक्स करून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik