तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालून कढी पत्ता घालावा.
आता मिरची आणि कांदा घालावा व परतवून घ्यावा.
आता यानंतर टोमॅटो घालावा.
मग मिक्स व्हेजिटेबल टाकावे. 2-3 मिनट शिजवून घ्यावे.
आता दोन कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
उकळी आल्यानंतर शेवया घालाव्या. व हलवूंन घ्या जेणेकरून गाठी तयार होणार नाही.
आता यामध्ये कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा.
गरम व्हेज शेवया सर्व्ह करा.ह्या व्हेज शेवया झटपट तयार होतात. तसेच खूप पौष्टिक तर असताच शिवाय चविष्ट देखील लागतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.