साहित्य-
एक वाटी मटार
तीन चमचे मलाई
तीन चमचे कांद्याची पेस्ट
पाच चमचे टोमॅटोची प्युरी
एक चमचा आले लसूण पेस्ट
एक चमचा कोथिंबीर
अर्धा चमचा हळद
एक चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
कृती-
शाही मटर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी हिरवे मटार घेऊन त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून ते उकळवून घ्यावे. यानंतर एका कढईत तेल घालून त्यामध्ये जिरे आणि हिंग घालावे. यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, लसूण आणि आले पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले घालून परतवून घ्यावे. व मसाल्यामधून तेल वेगळे होइसपर्यंत परतवावे. नंतर त्यामध्ये मटार घालावे व झाकण ठेऊन द्यावे. नंतर त्यात मलाई घालावी. व पाच मिनिट शिजवून गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली शाही मटार भाजी, पराठा सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik