साहित्य-
250 ग्रॅम पनीर
1 चमचा शेंगदाणे
1 चमचा खरबूज बी
1 चमचा खसखस
1 चमचा धणे पूड
5-6 काजू
लाल तिखट
चिमूटभर मिरे पूड
1 चमचा साखर
टोमॅटो प्युरी
तूप
तेल
1 कप दूध
ताजी साय
1 चमचा कसुरी मेथी
1/4 चमचा हळद
शाही पनीर मसाला
चवीनुसार मीठ
2 चमचे ताजे दही
कृती-
सर्वात आधी काजू, शेंगदाणे, खसखस आणि खरबूज बिया 5-7 तास भिजत ठेवाव्या. नंतर या सर्व वस्तू बारीक करून पेस्ट बनवा. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाकून ही पेस्ट घालावी व परतवून घ्यावी. आता त्यामध्ये आले मिरची पेस्ट घालून परतवून घ्या. नंतर टोमॅटो प्युरीमध्ये मीठ, धणेपूड, तिखट, हळद घालून परतवून घ्या.
तसेच आता यामध्ये दही घालावे. व क्रीम घालून परतवून घ्या. पनीर घातल्यानंतर यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून आणखी 1 मिनिट परतून घ्या, तसेच दूध घालून एकसारखे मिक्स होऊ दयावे. व झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवून घ्या. आता गॅस बंद करून तूप आणि थोडे किसलेले चीज घालावे. तर चला तयार आहे आपले कांदे न वापरता शाही पनीर रेसिपी, डिनरमध्ये पराठा सॊबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik