Marathi Biodata Maker

सोप्या किचन टिप्स

Webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (20:18 IST)
1 वरणासाठी डाळ शिजवताना या मध्ये मेथीदाणे मिसळा, ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास होणार नाही आणि वरण देखील चविष्ट लागेल . 
 
2 घरात ब्रेड किंवा पाव शिल्लक राहिले असतील तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या,आलं, कांदा,मीठ पाणी मिसळून घोळ बनवा आणि ब्रेड पकोडे बनवा.
 
3 केक किंवा पुडिंग बनवताना बेदाणे आणि सुकेमेवे घालायचे असल्यास घोळात घालण्यापूर्वी कोरड्या गव्हाच्या पिठात लावून घ्या .असं केल्यानं बॅक करताना ते घोळात बुडणार नाही.
 
4 खीर बनवताना दूध उकळल्यावर गॅस मंद करून 8 चा आकार बनवत लाकडाच्या चमच्याने सतत ढवळून घ्या साखर नेहमी शेवटी मिसळा. असं केल्यानं खिरीचा तांदूळ लवकर शिजतो. साखर आधीपासून मिसळल्यावर तांदूळ शिजायला वेळ लागतो.
 
5 एखाद्या पदार्थात बटर घालताना बटरच्या बरोबर थोडंसं तेल मिसळा. बटर जळणार नाही.     
 
6 फरशीवर तेल, तूप, किंवा दूध सांडल्यावर त्यावर गव्हाचं पीठ टाका नंतर पेपर ने पुसून घ्या फरशीवरचे डाग आणि तेलकटपणा नाहीसा होतो. 
 
7 स्वयंपाक करताना भांड जळाल्यावर त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट घालून त्यामध्ये पाणी घालून उकळवून घ्या भांड स्वच्छ होईल.
 
8 गॅस किंवा किचन कट्ट्याची स्वच्छता करण्यासाठी जुने मोजे वापरा. ह्याच्याने स्वच्छता चांगली होईल आणि स्क्रॅच देखील येणार नाही.
 
9 किचनमधील वॉशबेसिन चे डाग काढण्यासाठी लिंबाला व्हिनेगरमध्ये बुडवून बेसिनवर घासा.
 
10 क्रॉकरी स्वच्छ करण्यासाठी स्पंज वापरा, या मुळे क्रॉकरीवर स्क्रॅच पडत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

30 नंतर महिलांनी lifestyle मध्ये करावेत हे बदल

जगातील सर्वात कमी वजन असलेली मुलगी, जी मांजरापेक्षाही हलकी, १७ व्या वर्षी २.१३ किलो वजन

Instant Idli तांदूळ किंवा उडीद डाळीची गरज नाही, रवा आणि दह्यापासून झटपट तयार करा

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

डिहायड्रेशन टाळण्यासाठी हे ५ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

पुढील लेख
Show comments