सर्वांना ढाब्याचे पनीर तर आवडतात पण घरात बनवताना त्यामध्ये स्मोकी चव येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही सांगत आहोत पालक पनीर बनविण्याची गावरान किंवा देशी चव. चला तर मग साहित्य आणि कृती लिहून घ्या.
साहित्य-
1 जुडी पालक, 150 ग्रॅम पनीर, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे लिंबाचा रस, 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, दीड चमचा धणेपूड, 1 चमचा तिखट, लोणी आणि तेल गरजेप्रमाणे, 1 चमचा साजूक तूप, मीठ चवीप्रमाणे.
कृती -
पालकाचे पाने चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. एका भांड्यात पाणी उकळविण्यासाठी ठेवा पाणी उकळताना त्या मध्ये चिमूटभर बेकिंग सोडा आणि मीठ घाला.
पाणी उकळू लागल्यावर त्यामध्ये पालकाचे पाने 20 सेकंदासाठी घाला आणि लगेचच काढून थंड पाण्यात घाला. आता ह्या पालकाची प्युरी बनवा. एका पॅन मध्ये लोणी आणि तेलाच्या मिश्रणाला गरम करा आणि त्यामध्ये कांदा सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. पॅन मध्ये लसूण, तिखट, धणेपूड आणि मीठ घालून मिसळा.
पॅन ला तिरके करून तेल बाजूला करा वरून थोडंसं पाणी घाला. असं केल्याने पॅन काही सेकंदासाठी पेटेल आणि आपल्या डिशला ढाब्या स्टाइलचे स्मोकी फ्लेवर येईल. पनीरचे तुकडे पॅन मध्ये घाला आणि हळुवार हाताने मिसळा. दोन ते तीन मिनिटे शिजवा. पालकाची प्युरी पॅनमध्ये घालून एक उकळी द्या आणि गॅस बंद करा.
ग्रेव्ही जास्त उकळवू नका, अन्यथा त्याचा नैसर्गिक हिरवा रंग निघून जाईल. लिंबाचा रस मिसळा. आता एका दुसऱ्या पॅन मध्ये तूप गरम करा त्यात जिरा घालून हिरव्या मिरच्या घाला आणि ही फोडणी ताबडतोब तयार पालक पनीर मध्ये घाला पालक पनीर नान, पराठे,किंवा जिरा राईस सह सर्व्ह करा.