Daily Horoscope
✕

ताकातील पालकची भाजी रेसिपी

Webdunia
बुधवार, 11 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य- 
पालक - दोन कप
तुरीची डाळ- अर्धी वाटी
ताक - एक कप
शेंगदाणे - अर्धा कप
लसूण - पाच लवंगा
कांदा - एक 
धणेपूड - एक टीस्पून
जिरे - अर्धा टीस्पून
मोहरीचे तेल - दोन चमचे
टोमॅटो - एक 
हिरवी मिरची - दोन चिरलेली 
हळद - अर्धा टीस्पून
चवीनुसार मीठ  
लिंबाचा रस - एक टीस्पून
 
कृती-
सर्वात आधी तुरीची डाळ स्वच्छ धुवून हळद आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. आता कढईत तेल घालावे. त्यामध्ये जिरे घालावे मग लसूण आणि शेंगदाण्याचे कूट घालून हलके तपकिरी होईपर्यंत परतवून घ्यावे. आता त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावा. यानंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालावी. नंतर ताक आणि वरील सर्व मसाले घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा. आता यामध्ये चिरलेला पालक घालावा आणि 5 मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा. तसेच या मिश्रणात आता शिजवलेली डाळ घालावी. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून पातळ करावी. आता यामध्ये मीठ घालून लिंबाचा रस घालावा.  नंतर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली ताकातील पालकाची भाजी, गरम पोळी, भात किंवा पराठ्यासोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

Tiffin Snacks Recipe मुलांना हे ५ हेल्दी टिफिन स्नॅक्स नक्की आवडतील, पाककृती लक्षात घ्या

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

पुढील लेख
Show comments