Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्री जेवणात बनवा स्वादिष्ट भरलेल्या कारल्याच्या भाजी

bharva karela
, शुक्रवार, 18 जुलै 2025 (13:55 IST)
साहित्य-
कारले-सहा
बटाटे - दोन मध्यम
कांदा -एक मोठा
हिरव्या मिरच्या - दोन
कोथिंबीर
मीठ - चवीनुसार
हळद - अर्धा टीस्पून
लाल मिरची पावडर - एक टीस्पून
धणे पावडर - एक टीस्पून
आमसूल पावडर - अर्धा टीस्पून  
 मोहरी - अर्धा टीस्पून
हिंग
तेल  
ALSO READ: पावसाळा स्पेशल कुरकुरीत पोहे पकोडे रेसिपी
कृती
सर्वात आधी कारल्याला चांगले धुवा. त्यानंतर दोन्ही टोके कापून घ्या. आता कारल्याला मधून उभ्या उभ्या चिरून घ्या आणि आतून बिया काढून टाका. कारल्याला थोडे मीठ लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा, जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होईल. त्यानंतर कारल्याला धुवून वाळवा. आता एका भांड्यात उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घाला. त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, धणेपूड, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ आणि आमसूल पावडर घाला. मसाले बटाट्यांसोबत चांगले चांगले मिसळा. आता हळूहळू हे मिश्रण कारल्याच्या आत भरा. कारल्याचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या. अशा प्रकारे सर्व कारले भरा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी आणि हिंग घाला. मोहरी तडतडायला लागल्यावर, भरलेले कारले हळूहळू पॅनमध्ये ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मध्येमध्ये कारले काळजीपूर्वक फिरवत रहा जेणेकरून ते दोन्ही बाजूंनी चांगले शिजतील. कारले मऊ होईपर्यंत सुमारे २५-३० मिनिटे शिजवा. तर चला तयार आहे स्वादिष्ट भरलेली कारल्याची भाजी रेसिपी, पराठ्यासोबत गरम नक्कीच सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: स्वादिष्ट बटाट्याच्या धिरडे रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरी बनवा हेल्दी रेसिपी Banana Chocolate Protein Brownies