बटाट्याचे समोसे आपण खाललेच असणार. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत भाज्या भरून केलेले समोसे.चवीला चविष्ट असण्यासह हे पौष्टीक देखील आहे.चला तर मग साहित्य आणि कृती लिहून घ्या.
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा,ओवा,मीठ,लिंबाचा रस,घालून घट्ट कणिक मळून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा घालून कांदा तपकिरी होई पर्यंत परतून घ्या.या मध्ये बटाटे,मटार, गाजर,फुलकोबी सह मॅश केलेल्या भाज्या घाला. कोथिंबीर आणि चाट मसाला घाला.
आता मैद्याच्या कणकेच्या गोल लाट्या करून त्या लाट्यांना पुरीचा आकार देऊन त्याला दोन भागांमध्ये कापून घ्या.अर्ध्या भागाच्या टोकाला चिटकवून या मध्ये भाज्यांचे सारण भरा आणि टोकाला पाण्याचा हात लावून बंद करा. कढईत तेल तापत ठेवा आणि हे समोसे सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. गरम समोसे खाण्यासाठी तयार.